तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री गर्ल'चा हातात हात धरलेला फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:03 IST2026-02-15T15:01:40+5:302026-02-15T15:03:36+5:30

तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप, विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडला? 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

Vijay Varma Latest Post On Valentine Day Hold Girl Hand Sparks Buzz After Split From Tamannaah Bhati | तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री गर्ल'चा हातात हात धरलेला फोटो केला शेअर

तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री गर्ल'चा हातात हात धरलेला फोटो केला शेअर

अभिनेता विजय वर्मा पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे का? या प्रश्नाने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर विजयने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या पोस्टमागचं सत्य काहीतरी वेगळंच असल्याचं समोर येत आहे.

विजय वर्माने १४ फेब्रुवारी रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. फोटोत चेहरा दिसत नसला तरी कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं होतं, "Happy Valentine’s Day to my forever". इतकंच नाही तर त्याने 'खुशी आहुजा' नावाच्या एका मुलीला टॅग देखील केलं होतं.

ही पोस्ट पाहताच विजय पुन्हा प्रेमात पाडल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला. उत्सुक चाहत्यांनी खुशी आहुजाचं प्रोफाईल शोधून काढलं.  या अकाउंटवर 'मिर्झापूर'मधील दादा त्यागी यांचा फोटो होता. ही पोस्ट म्हणजे विजयचा चाहत्यासोबत केवळ एक प्रँक असल्याचं समोर आलं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चाहत्यांची मस्करी करण्यासाठी त्यानं पोस्ट शेअर केली होती.

तमन्नासोबतचं ब्रेकअप
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचं प्रेम 'लस्ट स्टोरीज २' च्या सेटवर फुललं होतं. मात्र, २०२५ च्या सुरुवातीला त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर विजयचं नाव 'गुस्ताख इश्क'मधील त्याची सह-कलाकार फातिमा सना शेखसोबत जोडलं गेलं. पण फातिमाने एका कार्यक्रमात "माझ्या आयुष्यात सध्या कोणीही नाही", असं सांगत या अफवा फेटाळून लावल्या होत्या.
 

Web Title : तमन्ना से ब्रेकअप के बाद विजय वर्मा के डेटिंग की अफवाह, निकला प्रैंक!

Web Summary : तमन्ना भाटिया से ब्रेकअप के बाद विजय वर्मा की वैलेंटाइन डे पोस्ट ने डेटिंग की अफवाहों को हवा दी। हालाँकि, यह 'खुशी आहुजा' नामक एक प्रशंसक के साथ एक प्रैंक था, जो मिर्जापुर का एक किरदार निकला, जिससे रिश्ते की अटकलें खारिज हो गईं।

Web Title : Vijay Varma sparks dating rumors after Tamannaah breakup, it's a prank!

Web Summary : Vijay Varma's Valentine's Day post, featuring a mystery girl's hand, ignited dating rumors post-Tamannaah breakup. However, it was a prank with a fan, 'Khushi Ahuja', revealed to be a Mirzapur character, dismissing relationship speculation.