विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:51 IST2025-11-06T15:50:39+5:302025-11-06T15:51:37+5:30
साखरपुडा झाल्यावर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?

विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना हे सतत चर्चेत असलेलं कपल आहे. दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या महिन्यात विजय आणि रश्मिकाने एंगेजमेंट केल्याची चर्चा झाली. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी अंगठी फ्लॉन्ट केली. तसंच या चर्चांवर हो किंवा नाही असं काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे या लव्हबर्ड्सने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा होती. तर आता त्यांच्या लग्नाबद्दल अपडेट समोर आलं आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूर येथे दोघं लग्नगाठ बांधतील अशी चर्चा आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची तारीख २६ फेब्रुवारी लिहिली आहे. उदयपूरमध्ये एका ग्रँड पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडेल असंही त्यात म्हटलं आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे मात्र विजय किंवा रश्मिका दोघांकडूनही कोणतंही कन्फर्मेशन आलेलं नाही.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिकाने ३ ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला. यावेळी त्यांचे कुटुंबीयच हजर होते. तर काही दिवसांपूर्वीच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिकाला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती हसतच 'सगळ्यांना माहितच आहे' असं म्हणाली होती. तसंच चाहत्यांसोबत 'मीट अँड ग्रीट'मध्येही रश्मिकाने 'मी विजयशी लग्न करेन'असं उत्तर दिलं होतं.
I'll marry VIJAY❤️
— THE🗿𝕏 (@TheDEVERA_fan) November 5, 2025
Says RashmikaDeverakonda#VijayDeverakonda#RashmikaMandannapic.twitter.com/PXhHsQ0wfx
रश्मिका मंदाना आणि विजय यांची लव्हस्टोरी 'गीता गोविंदम'च्या शूटवेळी सुरु झाली. याआधी रश्मिकाने २०१७ सालीच अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. मात्र एका वर्षातच त्यांचं नातं तुटलं