विद्युत जामवालने आपल्या अॅक्शन स्टंटने सगळ्यांना केले थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 18:59 IST2021-10-04T18:58:48+5:302021-10-04T18:59:09+5:30
विद्युत जामवाल लवकरच 'सनक' चित्रपटात झळकणार आहे.

विद्युत जामवालने आपल्या अॅक्शन स्टंटने सगळ्यांना केले थक्क!
'सनक' या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाआधी, विद्युत जामवालने आज लाईव्ह सादर केलेल्या हाई-ऑक्टेन ऍक्शनने सगळ्यांना थक्क केले. बहुप्रतीक्षित एंटरटेनर 'सनक - होप अंडर सीज'च्या अधिकृत ट्रेलरचे काउन्ट डाउन सुरू झाले असून लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. मात्र, त्याआधी विद्युतने एका जळत्या एलईडी स्क्रीनला तोडत कार्यक्रमात बहारदार एंट्री घेतली आणि सर्वांना चकित केले. या निमित्ताने 'सनक'च्या निर्मात्यांनी उपस्थित सर्वांना लाईव्ह ऍक्शनचा अनुभव दिला ज्यामध्ये विद्युत जामवालला जवळून बघण्याची संधी मिळाली, जेव्हा अभिनेत्याने स्क्रीनचा चक्काचूर करत एक हीरोइक एंट्री घेतली.
कनिष्क वर्मा यांच्याद्वारे दिग्दर्शित 'सनक'मध्ये प्रेक्षकांसमोर एक अशी शैली सादर करण्यात आली आहे, जिला अजूनपर्यंत जास्त एक्सप्लोर करण्यात आलेले नाहीये. या चित्रपटात विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा दिसणार आहे, जी या होस्टेज ड्रामासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्यास पूर्णपणे सज्ज असून भावनात्मक सीन्स आणि नेक्स्ट लेवल ऍक्शनने ओतप्रोत भरली आहे कारण चित्रपटात एक हॉस्पिटल ओलीस ठेवण्यात आले आहे.
विद्युत जामवाल म्हणतो की, “सनकसोबत आम्ही प्रेक्षकांसाठी एड्रेनालाईन अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व अॅक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. तुम्हाला 'सनक' अवश्य पाहायला हवा आहे."
विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून १५ ऑक्टोबरपासून केवळ डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.