'या' सुपरस्टारसोबत विद्या बालनला करायचा आहे रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 15:06 IST2024-04-18T14:47:50+5:302024-04-18T15:06:34+5:30

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

vidya balan wants to do romantic movie with shah rukh khan 2 | 'या' सुपरस्टारसोबत विद्या बालनला करायचा आहे रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

'या' सुपरस्टारसोबत विद्या बालनला करायचा आहे रोमान्स, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री विद्या बालन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दो और दो प्यार' येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे विद्या बालन पुन्हा एकदा नवी भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तिने मोठे खुलासे केले. या मुलाखतीमध्ये विद्या बालनने बॉलिवूडचा किंग खानसोबत एक रोमँटिक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोणत्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम करायला आवडेल या प्रश्वार उत्तर देताना विद्या म्हणाली, 'ओम शांती ओममध्ये माझी खूप छोटी भूमिका होती. मला शाहरुखसोबत एका चांगल्या लव्हस्टोरीमध्ये काम करायला आवडेल'.

विद्या बालन कॉमेडी चित्रपटांबाबत म्हणाली, 'एक अभिनेता म्हणून मला असं वाटतं की मला कॉमेडी करण्याची संधी मिळाली नाही आणि मी कॉमेडी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रेक्षक म्हणूनही मला कॉमेडी बघायला आवडते आणि हा माझा आवडता प्रकार आहे'. दरम्यान विद्या आणि अक्षय कुमारच्या 2007 मध्ये आलेल्या 'हे बेबी'मध्ये शाहरुख खान दिसला होता 'हे बेबी' या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ होता. त्याच वर्षी विद्या बालनने शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटात कॅमिओ केला होता.

Web Title: vidya balan wants to do romantic movie with shah rukh khan 2