Video: पंकज उधास यांच्या शोकसभेत फॅन घ्यायला आला सेल्फी; विद्या बालनने केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:14 IST2024-02-28T12:13:21+5:302024-02-28T12:14:35+5:30

पंकज उधास यांच्या शोकसभेला फॅन सेल्फी घ्यायला येताच विद्या बालनच्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

Vidya Balan reacted to a fan trying to take selfie at Pankaj Udhas funeral watch video | Video: पंकज उधास यांच्या शोकसभेत फॅन घ्यायला आला सेल्फी; विद्या बालनने केलं असं काही...

Video: पंकज उधास यांच्या शोकसभेत फॅन घ्यायला आला सेल्फी; विद्या बालनने केलं असं काही...

दिग्गज गायक पंकज उधास यांचं ७२ व्या वर्षी  निधन झालं. पंकज यांच्या निधनाने सर्वांवर शोककळा पसरली. पंकज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी विद्या बालन सुद्धा पंकज यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होती. अशातच विद्याचा आणि तिच्या एका फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

झालं असं की... विद्या बालन पंकज उधास यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होती. तिच्यासोबत तिची सेक्रेटरी होती. गाडी मागे पार्क करुन पंकज यांच्या निवासस्थानी विद्या चालत गेली. त्यावेळी एक फॅन तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिच्या वाटेत आडवा येत होता. विद्याची सेक्रेटरी त्याला बाजूला व्हायला सांगत होती. पण फॅन काही ऐकत नव्हता. पुढे तो फॅन बाजूला सरकला. या प्रसंगात विद्या शांतपणे चालत होती. तिने त्या फॅनकडे दुर्लक्ष केलं. 

एरवी अशा प्रसंगी सेलिब्रिटी फॅन्सवर रागावतात. पण विद्या मात्र शांत राहिली. त्यामुळे तिच्या वागण्याचं कौतुक होतंय. ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारीला दुःखद निधन झालं. पंकज गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरने त्रस्त होते. पण अखेर २६ फेब्रुवारीला पंकज उधास यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Vidya Balan reacted to a fan trying to take selfie at Pankaj Udhas funeral watch video