आयर्न लेडी इंदिरा गांधीच्या भूमिकेत विद्या बालन, वेब सिरीजमधून उलगडणार अनेक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:00 IST2019-04-11T11:58:01+5:302019-04-11T12:00:51+5:30
प्रोडक्शन टीम सध्या विद्याला परफेक्ट लूक देण्याची तयारी करत आहे. परफेक्ट लूकसाठी प्रोस्थेटिक मेकअप वापरण्याची शक्यता आहे.

आयर्न लेडी इंदिरा गांधीच्या भूमिकेत विद्या बालन, वेब सिरीजमधून उलगडणार अनेक गोष्टी
चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. भारताच्या आयर्न लेडी आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित वेब सिरीज येणार असल्याच्या चर्चा ब-याच दिवसांपासून रंगत आहेत. इंदिरा गांधी यांची व्यक्तीरेखाही विद्या बालन साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर मात्र विद्याकडून कोणत्याच प्रकारचे संकेत मिळाले नव्हते. मात्र मिळालेल्या माहिती नुसार प्रोडक्शन टीम सध्या विद्याला परफेक्ट लूक देण्याची तयारी करत आहे. परफेक्ट लूकसाठी प्रोस्थेटिक मेकअप वापरण्याची शक्यता आहे.
इंदिराजींची अनेक छायाचित्रे पाहून त्यांचे पोशाख लक्षात घेऊन फॅशन डिझायनर पोशाख तयार करतील. या भूमिकेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी विद्याही वेगवेगळ्या गोष्टी करत मेहनत घेत आहे. बायोपिक सिनेमातील ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन असे विद्याने म्हटले आहे.
या वेबसिरीजमध्ये १९७५मधील आणीबाणीचे कारण, मुलगा संजय गांधीसोबत झालेले मतभेद, राजकीय मतभेद , राजकारणातील डावपेच अशा वेगवेगळ्या गोष्टी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहेत.सागरिका घोष यांचे पुस्तक 'इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर'वर आधारित ही वेबसिरीज असणार आहे.