लॉकडाउनमध्ये विद्या बालन करतेय ही गोष्ट, पहा त्याचा हा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 14:35 IST2020-04-24T14:35:07+5:302020-04-24T14:35:45+5:30
लॉकडाउनमध्ये विद्या बालन घरातच कैद असून नवनवीन गोष्ट करत असते.

लॉकडाउनमध्ये विद्या बालन करतेय ही गोष्ट, पहा त्याचा हा व्हिडिओ
बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. लॉकडाउनमध्ये घरात कैद असलेली विद्या सध्या नवनवीन गोष्टी करताना दिसते आहे. यापूर्वी विद्याला घरातील कामे करताना पाहिले होते. तिला कुकिंगची आवड नाही आणि तिला फारसे जेवण बनवतादेखील येत नाही. मात्र काही दिवसांपासून ती जेवण बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला मज्जादेखील येत आहे.
नुकतेच विद्याला मोदक बनवताना पाहिले. तिला मोदक खूप आवडतात. विद्याने कित्येक वेळा सांगितले आहे की, तिला जेवण बनवण्यात इंटरेस्ट नाही. त्यामुळे तिला जेवण बनवता येत नाही. मात्र या लॉकडाउनमध्ये आपण कित्येक प्रसिद्ध सेलिब्रेटींना इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमांवर पदार्थ बनविताना आणि फोटो शेअर करताना पाहिले आहे. त्यानंतर आता विद्याचादेखील मोदक बनवितानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
विद्याने म्हटले की, मी नेहमी जेवण बनविण्याकडे घरगुती असण्याच्या रुपात पहायचे. पण, लॉकडाउनमध्ये हा नवीन शोध आहे.
विद्याने जास्त स्त्रीकेंद्रीत भूमिका साकारली आहे आणि तिचे मत आहे की जेवण बनवणे ही घरगुती भूमिका आहे आणि त्यात ती फिट होणार नाही. मात्र या लॉकडाउनमध्ये तिला नवीन गोष्ट माहित झाली आणि त्याचा ते आनंद घेत आहेत.
विद्या बालन शकुंतला देवी बायोपिकमध्ये दिसणार आहे. लॉकडाउननंतर हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. याशिवाय ती शेरनीमध्येही काम करताना दिसणार आहे. यात ती वन अधिकारीची भूमिका साकारणार आहे.