चुलत बहिणी असूनही बोलत नाहीत 'या' दोन अभिनेत्री, एक बॉलिवूड तर दुसरी साउथ 'क्वीन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:55 IST2025-10-16T15:55:14+5:302025-10-16T15:55:53+5:30
दोघींच्या वडिलांचा असतो एकमेकांशी संपर्क, मात्र अभिनेत्रींमध्ये का अबोला?

चुलत बहिणी असूनही बोलत नाहीत 'या' दोन अभिनेत्री, एक बॉलिवूड तर दुसरी साउथ 'क्वीन'
मनोरंजनविश्वात अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे नातेवाईकही आहेत. कित्येकांना याची कल्पनाही नसते. चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांमधील नाती समदल्यावर आश्चर्यचकित होतात. इंडस्ट्रीत अशाच दोन बहिणी आहेत. एक बॉलिवूड तर दुसरी साउथमध्ये आघाडीवर आहे. मात्र दोघींचं आपापसात बोलणंही होत नाही असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
या अभिनेत्री आहेत विद्या बालन आणि प्रियामणि. दोघीही एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. दोघींचे कुटुंबीय एकमेकांच्या चांगले संपर्कात आहेत. मात्र या दोघींचं एकमेकींशी पटत नाही. 'न्यूज १८ शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणिनेच विद्या बालनसोबतच्या नात्यावर खुलासा केला. ती म्हणाली, "आमच्या दोघींचं एकमेकींशी बोलणं होत नाही. जेव्हा की आम्ही चुलत बहिणी आहोत. तिच्या वडिलांशी माझं बऱ्याचदा बोलणं होत असतं. काका माझ्याशी वेळोवेळी बोलत असतात. माझ्याशी बोलणं झालं नाही तर ते माझ्या वडिलांनाही फोन करतात."
ती पुढे म्हणाली, "विद्या बालन खूप अद्भूत आणि चांगली अभिनेत्री आहे. आम्हाला नेहमीच एकमेकींचं कौतुकच वाटलं आहे. मी तर तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहे. एक प्रेक्षक म्हणून मला ती खूप आवडते."
प्रियामणि लवकरच 'द फॅमिली मॅन ३'मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती मनोज वाजपेयींच्या पत्नीची सुचित्राची भूमिका साकारत आहे. सुचित्राच्या लोणावळ्यातील त्या रहस्यावरुन यावेळी तरी पडदा उठणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.