अभिनेता रणवीर सिंगने परिधान केलेल्या साखळीची किंमत किती माहितीये? आकडा वाचून उडेल तुमची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:53 IST2024-05-12T15:52:30+5:302024-05-12T15:53:51+5:30

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंगला ओळखलं जातं

VIDEO: Ranveer Singh Wears ₹2 Crore Diamond Necklace, High Heels At Mumbai Event | अभिनेता रणवीर सिंगने परिधान केलेल्या साखळीची किंमत किती माहितीये? आकडा वाचून उडेल तुमची झोप!

अभिनेता रणवीर सिंगने परिधान केलेल्या साखळीची किंमत किती माहितीये? आकडा वाचून उडेल तुमची झोप!

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंगला ओळखलं जातं. रणवीर सिंग फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय. आपल्या अतरंगी स्टाइल स्टेटमेंट आणि वेगवेगळ्या भूमिकामुळं तो नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. यात पुन्हा एकदा रणवीर चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या गळ्यातील साखळीचीच जास्त चर्चा होत आहे.  वरवर दिसायला साखळी छोटी असली तरीही त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल.

अलिकडेच रणवीरने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश लूकमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रेडकार्पेटवर तो पापाराझींना फोटोसाठी पोझ देत होता. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या एकंदरीत लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं.  यावेळी ज्या गोष्टींने लक्ष वेधून घेतलं, ती म्हणजे त्याच्या गळ्यात असलेली दुहेरी साखळी. साधी वाटत असली तरी तिची किंमत कोटींच्या घरात आहे. 

रणवीर सिंगच्या गळ्यातील हिऱ्यांची ही साखळी खूपच महागडी आहे. एका रिपोर्टनुसार या साखळीची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे.  त्यामुळे छोटा दिसणारा हा नेकलेस किंमतीने किती मोठा आहे, याची कल्पना आपण करु शकतो. रणवीर सिंगच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच फरहान अख्तरच्या 'डॉन ३' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कियारा आडवणीदेखील झळकणार आहे. 
 

Web Title: VIDEO: Ranveer Singh Wears ₹2 Crore Diamond Necklace, High Heels At Mumbai Event