Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 10:12 IST2019-02-01T10:06:45+5:302019-02-01T10:12:37+5:30

लग्नानंतरही रणवीर सिंग व दीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले.

Video: ranveer singh and deepika padukone on a romantic dinner date | Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

Video: रणवीर सिंगचा हा अंदाज पाहुन तुम्हीही म्हणाल, नवरा असावा तर असा...!

ठळक मुद्देतूर्तास रणवीर आपल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. यापूर्वी आलेला रणवीरचा ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला.

लग्नानंतरही रणवीर सिंगदीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी त्यांची बॉन्डिंग पाहण्यासारखी होती. केवळ इतकेच नाही तर यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले.
होय, दीपिका व रणवीर रेस्टॉरंटबाहेर दिसताच, कॅमेऱ्यांची क्लिक क्लिक सुरु झाली. याचदरम्यान दीपिकाच्या जीन्सवर काहीतरी लागल्याचे रणवीरच्या लक्षात आले. मग काय, कॅमे-यांची पर्वा न करता रणवीरने आपल्या हातांनी दीपिकाची जीन्स झटकून स्वच्छ केली. यानंतर त्याने दीपिकाला गोड अलिंगण देत, तिच्या गालांचे हळुवार चुंबन घेतले.

रणवीरचा हा अंदाज पाहून दीपिका चांगलीच हरकली. तिच्या चेह-यावर एक तितकेच गोड हसू पसरले. यानंतर दोघेही हसत हसत आपल्या कारकडे रवाना झालेत. यापूर्वी लग्नाच्या रिसेप्शनमध्येही रणवीर दीपिकाची साडी सावरतांना दिसला होता. त्यावेळीही तो अगदी परफेक्ट पती असल्याचे सिद्ध झाले होते.


तूर्तास रणवीर आपल्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. यापूर्वी आलेला रणवीरचा ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटात बॉक्स आॅफिसवर २५० कोटींची कमाई केली. दीपिकाचे म्हणाल तर सध्या ती ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. तिचा हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. एकंदर काय तर दोघेही आपआपल्या कामात बिझी आहेत. पण एकमेकांसाठी वेळ कसा काढावा, हे दोघांनाही चांगलेच ठाऊक आहे.

 

 

Web Title: Video: ranveer singh and deepika padukone on a romantic dinner date