Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:10 IST2025-10-01T13:09:46+5:302025-10-01T13:10:11+5:30
Rakhi Sawant : राखीने "बिग बॉस १९" या रिएलिटी शोमध्ये भाग घेण्यापासून ते तान्या मित्तलच्या दाव्यांपर्यंत विविध गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली.

Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
ड्रामा क्वीन राखी सावंत भारतात परतली आहे. "पती पत्नी और पंगा" च्या सेटवर ती दिसली. राखीने यावेळी "बिग बॉस १९" या रिएलिटी शोमध्ये भाग घेण्यापासून ते तान्या मित्तलच्या दाव्यांपर्यंत विविध गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिचे वडील असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच तिने अभिनव कश्यपला त्याची उलटी गिनती सुरू झाली आहे आणि ती लवकरच त्याला सरळ करेल असं म्हटलं.
मीडियाशी संवाद साधताना राखी सावंत म्हणाली की, "माझी आई आता या जगात नाही. माझ्या आईने एक चिठ्ठी ठेवली होती की, तुझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत. मी संपूर्ण मिया खलिफा विकत घेतला आहे. ओह, सॉरी, बुर्ज खलिफा. मी लवकरच बिग बॉसमध्ये जाणार आहे आणि तिथे मी धमाल करेन." राखी पुन्हा शोमध्ये दिसणार की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही.
राखीने "तेली मसाला" ला दिलेल्या मुलाखतीत तान्या मित्तलवर भाष्य केलं आहे. "मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत आहे. बुर्ज खलिफात माझे ४-५ फ्लॅट आहेत. दुबईत माझे अनेक व्हिला आहेत. मी नाश्त्यात बकलावा-हकलावा खाते. तिथे खजूर, वजूर, तूप, हे सर्व आहे... मी त्यानेच आंघोळ करते. मी सोन्या-चांदीच्या धाग्यांनी वीणलेल्या साड्या नेसते. माझे हिरे आणि दागिने पाहा."
"माझ्याकडे २०० बॉडीगार्ड आहेत. तुम्हाला समजलं ना... आणि माझ्याकडे खूप नोकर आहेत, जर मला घरात बाथरूममध्ये जायचं असेल तर मला सायकलने जावं लागतं. माझं घर खूप मोठं आहे. त्यामुळे तान्या, तू खूपच छोटी आहेस" असं राखीने म्हटलं. पुन्हा एकदा राखी परत आलेली पाहून अनेकांना आनंद झाला आहे. तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.