विकी कौशल आता सोशल मीडियाद्वारे घाबरवणार फॅन्सना, अशी असणार त्याची स्ट्रॅटेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 19:13 IST2020-02-06T19:10:53+5:302020-02-06T19:13:21+5:30
विकी कौशल भूत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने एक भन्नाट कल्पना शोधली आहे.

विकी कौशल आता सोशल मीडियाद्वारे घाबरवणार फॅन्सना, अशी असणार त्याची स्ट्रॅटेजी
विकी कौशलच्या भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटात त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
विकी कौशल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने एक भन्नाट कल्पना शोधली आहे. भूत स्केअर्स नावाचे एक अभियान या चित्रपटाच्या टीमद्वारे उद्यापासून सुरू केले जाणार आहे. याद्वारे लोकांना घाबरवण्यासाठी काही व्हिडिओज बनवण्यात येणार आहेत आणि हे व्हिडिओ विकी आणि या चित्रपटाची टीम आपापल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करणार आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक अनोखा फंडा वापरण्यात आला आहे.
भूतः द हाँटेड शिपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रेलर थरकाप उडवणारा असून या ट्रेलरमध्ये आपल्याला विकी कौशल, आशुतोष राणा यांना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.
भूतः द हाँटेड शिप या ट्रेलरमध्ये आपल्याला एक भलेमोठे जहाज दिसत असून हे जहाज अचानक समुद्रकिनारी मिळाले आहे. या जहाजात काय आहे हे पाहाण्यासाठी एक ऑफिसवर (विकी कौशल) त्याच्या आत जातो. पण त्याच्या आजूबाजूला अनेक सावल्या, भूतं आपल्याला फिरताना दिसतात. या ट्रेलरमध्ये एक बाई आणि मुलगी दिसत असून हे कोण आहेत असा प्रश्न नक्कीच पडतो. हा ट्रेलर पाहाताना आपल्या अंगावर काटा येतो यात काहीच शंका नाही.
भूतः द हाँटेड शिप या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले असून धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भूत हा धर्मा प्रोडक्शन आणि विकी कौशलचा पहिला हॉरर चित्रपट असून हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.