अबब! 'अश्वत्थामा'च्या भूमिकेसाठी विकी कौशल होणार अगडबम, वाढवणार इतके किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 15:22 IST2020-02-07T15:11:19+5:302020-02-07T15:22:51+5:30
याआधी उरी सिनेमासाठी विकीने वजन वाढवले होते.

अबब! 'अश्वत्थामा'च्या भूमिकेसाठी विकी कौशल होणार अगडबम, वाढवणार इतके किलो वजन
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल एका मागोमाग एक हीट सिनेमा गेल्या काही महिन्यांपासून देतो आहे. उरी: द सर्जिकल स्ट्राइक सिनेमानंतर विकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार उरीचा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी पुन्हा एकदा काम करणार आहे. 'अश्वत्थामा'वर सिनेमा तयार करत आहेत. यात विकी गुरू द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामाचीच भूमिका साकारणार आहे.
विकी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत करतो आहे. या भूमिकेसाठी तो तब्बल चार महिने ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती आहे. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. सध्या तो या सिनेमासाठी वजनदेखील वाढतोय. 115 किलो पर्यंत वजन विकी वाढवणार आहे.याआधी उरी सिनेमासाठी विकीने वजन वाढवले होते.
अश्वत्थामा हा महाभारतातील महत्त्वाचे पात्र होता. हा सिनेमा हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. 2021 साली हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
लवकरच विकीचा 'भूत पार्ट १- द हाँटेड शीप' त्याच्या चाहत्यांना त्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.भूतः द हाँटेड शिपच्या ट्रेलरमध्ये एक जहाज आणि त्यावर घडत असलेल्या विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत.