डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 12:02 IST2019-10-21T11:58:08+5:302019-10-21T12:02:32+5:30
होय, एका हॉटेलमध्ये एका पदार्थाला ‘हाऊज द जोश’ हे नाव देण्यात आले आहे.

डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश
विकी कौशल आज बॉलिवूडचा ए-लिस्ट स्टार आहे. अर्थात विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने स्वत:च्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने विकीला नवी ओळख दिली. या चित्रपटातील विकीच्या कामाचे अपार कौतूक झाले. २०१८ च्या जानेवारीत प्रदर्शित या चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रीपटासाठी विकीला अनेक पुरस्कारही मिळाले.
या चित्रपटातील विकीच्या तोंडचा ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला होता. हा डायलॉग सगळ्यांनाच उर्जा देऊन गेला. ‘हाऊज द जोश’ म्हटल्यावर ‘हाय सर’ हे शब्द आपसूक प्रेक्षकांच्या तोंडून बाहेर पडू लागलेत. एकंदर काय तर हा डायलॉग प्रत्येकाच्या तोंडात बसला. आता तर या फेमस डायलॉगची रेसिपीही तुम्हाला मिळणार आहे. होय, एका हॉटेलमध्ये एका पदार्थाला ‘हाऊज द जोश’ हे नाव देण्यात आले आहे. खुद्द विकीने याबद्दल माहिती दिली आहे.
विकीने एक फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना विकीने ‘उरी’ च्या टीमला टॅग केले आहे. आता ‘हाऊज द जोश’ ही डीश आहे, असे कॅप्शन त्याने दिले आहे. या आधी विकीचा हा डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना वापरला होता.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, विक्की सध्या सरदार उधम सिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी विक्कीचा सरदार उधम सिंगमधला लूक आऊट झाला होता. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही तो दिसणार आहे.