"भावा तुला तोड नाही...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर थक्क झाला विकी कौशल, रणवीर सिंगचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:24 IST2026-04-01T10:24:33+5:302026-04-01T10:24:53+5:30
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनेही 'धुरंधर २'चं कौतुक केलं आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला आणि आदित्य धरने दिग्दर्शित केलेला 'धुरंधर २' पाहून विकी कौशल थक्क झाला आहे.

"भावा तुला तोड नाही...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर थक्क झाला विकी कौशल, रणवीर सिंगचं केलं कौतुक
Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमाने भल्याभल्यांना अचंबित केलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे. 'धुरंधर २'चं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. रजनीकांत पासून ते करण जोहरने 'धुरंधर २' सिनेमासाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनेही 'धुरंधर २'चं कौतुक केलं आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला आणि आदित्य धरने दिग्दर्शित केलेला 'धुरंधर २' पाहून विकी कौशल थक्क झाला आहे.
विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्याने 'धुरंधर २'च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. "मी खूपच थक्क झालो आहे, खूप अभिमान वाटतोय आणि तुम्ही हा चित्रपट ज्या कलेने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणे बनवला आहे. त्याबद्दल पूर्णपणे भारावून गेलो आहे. हे खरंच सुवर्णमापदंडापेक्षा कमी नाही. या यशाच्या प्रत्येक क्षणासाठी तुम्ही पात्र आहात. अभिनंदन भाऊ", असं विकीने म्हटलं आहे.

पुढे त्याने रणवीर सिंग, आर माधवन, राकेश बेदी यांचंही कौतुक केलं आहे. विकी म्हणतो, "रणवीर सिंग भावा तू मला खूप प्रेरणा देतोस. अभिनेता म्हणून तुझी स्टाईल अप्रतिम आहे, तुला कशाचीच तोड नाही. “हौसला, इंधन, बदला”. माधवन सर, तुम्हाला पाहणे म्हणजे खूप आनंदाचा अनुभव होता! राकेश बेदी सर, तुम्ही कमाल आहात! मोठी मिठी ... प्रत्येक विभाग... संपूर्ण टीम... खूप खूप कौतुक! तुम्ही सगळेच खरे धुरंधर आहात".