विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 11:11 IST2019-04-03T11:10:12+5:302019-04-03T11:11:21+5:30

बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा नव्या दमाचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, ते विकी आणि त्याची लेडी लव्ह हरलीन सेठी या दोघांबद्दल.

vicky kaushal opens up about breakup rumours with harleen sethi |  विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

 विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

ठळक मुद्देविकीच्या कामाबद्दल बोलायचे तर लवकरच विकी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त’मध्ये दिसणार आहे. याशिवाय करण जोहरच्या एका हॉरर कॉमेडी चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे.

बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा नव्या दमाचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, ते विकी आणि त्याची लेडी लव्ह हरलीन सेठी या दोघांबद्दल. कॅटरिना कैफसोबत विकीच्या वाढत्या जवळीकीमुळे हरलीन दुखावली आणि तिने म्हणे विकीसोबत ब्रेकअप केले. अर्थात ना हरलीन याबाबत बोलली होती ना विकीने खुलासा केला होता. पण अखेर विकीने चुप्पी तोडलीच.


 हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विकीला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आले. यावर, हां जी, मैं एकदम सिंगल हू अभी...देखो एकदम अकेला..., असे विकी म्हणाला. यावर खरच तू सिंगल आहेस का? असे खोदून खोदून विचारल्यावर, ‘हां, एकदम सिंगल और रेडी टू मिंगल विद द आॅडियन्स’, असे विकीने सांगितले.
एकंदर काय तर मस्ती मूडमध्ये का होईना, पण विकीने हरलीनसोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केले.

काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विद करण 6’ या शोमध्ये करण जोहर कॅटरिनावरून विकीची फिरकी घेताना दिसला होता. माझी जोडी विकी कौशलसोबत चांगली दिसेल, असे कॅटरिनाने म्हणाल्याचे करणने विकीला सांगितले होते. तेव्हापासून कॅट व विकी यांच्या आॅफस्क्रिन रोमान्सच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चेत किती तथ्य आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण काहीतरी शिजतेय, इतके मात्र नक्की.
विकीच्या कामाबद्दल बोलायचे तर लवकरच विकी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त’मध्ये दिसणार आहे. याशिवाय करण जोहरच्या एका हॉरर कॉमेडी चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. यात विकीच्या अपोझिट भूमी पेडणेकरण लीड रोलमध्ये आहे.

Web Title: vicky kaushal opens up about breakup rumours with harleen sethi