Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding :  विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:25 IST2021-12-03T15:24:51+5:302021-12-03T15:25:35+5:30

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी व कतरिनाच्या लग्नात कडक सुरक्षा, ड्रोन दिसताच पाडण्याचे आदेश 

Vicky Kaushal-Katrina Kaif's wedding Ceremony Gets Confirmed By Sawai Madhopur District Magistrate's Office Letter | Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding :  विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding :  विकी व कतरिनाचं लगीन होणार...! नुसत्या चर्चा नाही तर हा घ्या पुरावा

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी कौशल (Vicky Kaushal) व कतरिना कैफ (Katrina Kaif) येत्या 9 डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. अद्याप विकी वा कतरिना दोघांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे अनेक चाहते अद्यापही साशंक आहेत. दोघांचं लग्न नक्की होणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. पण  लग्न होतंय, हे आता कन्फर्म आहे. होय, सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल होतंय. कतरिना आणि विकी यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर सवाई माधोपूर येथील जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलिस अधिका-यांना आदेश जारी करून बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश या पत्रकात दिले आहेत.

कतरिना व विकीच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखणे, लग्न परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कोरोना नियमांचे पालन करणे अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याचं पत्रकात नमूद आहे.अतिरिक्त जिल्हा अधिकारी सूरजसिंग नेगी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही बैठक जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये एसपी, हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी असतील.

ड्रोनवर बंदी...
चाहते विकी व कतरिनाच्या लग्नाची झलक पाहण्यास उत्सुक आहेत. पण लग्नाचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, यासाठी विकी व कतरिनाने म्हणे तगडा बंदोबस्त केला आहे. अगदी निमंत्रित पाहुण्यांसाठीही वेगवेगळ्या अटी व नियम लागू करण्यात आल्या आहेत.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नस्थळी वा त्या परिसरात कोणताही ड्रोन घिरट्या मारताना आढळल्यास तो पाडण्याचेही आदेश आहेत. सोशल मीडियावर लग्नाचा एकही व्हिडीओ वा फोटो शेअर होणार नाही, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडणार आहे. 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान चालणा?्या या कार्यक्रमात येणा?्या पाहुण्यांना गुप्त संकेताच्या आधारे प्रवेश दिला जाईल. लग्नात सहभागी होणा?्या सर्व पाहुण्यांची ओळखही गुप्त ठेवण्यात येणार आहे. हॉटेलच्या खोलीलाही दिलेल्या कोडवरून प्रवेश मिळेल.

Web Title: Vicky Kaushal-Katrina Kaif's wedding Ceremony Gets Confirmed By Sawai Madhopur District Magistrate's Office Letter