OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:06 AM2021-11-22T11:06:35+5:302021-11-22T11:10:16+5:30

होय, अजून लग्नही होत नाही तोच, कतरिना आणि विकीमध्ये जोरदार भांडण झाल्याची चर्चा आहे. सध्या या भांडणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

vicky kaushal got angry with katrina kaif after roka news leaked | OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

OMG!! लग्नाआधीच विकी कौशल व कतरिना कैफचं वाजलं? कारण वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

कतरिना कैफ ( Katrina Kaif ) व विकी कौशल ( Vicky Kaushal ) लवकरच लग्न करणार आहेत आणि या लग्नाची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. विकी व कॅट येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचा दावा केला जातोय. अशात दोघांचेही चाहते क्रेझी झाले आहेत. पण एका ताज्या बातमीने कदाचित चाहत्यांची निराशा होऊ शकते. होय, अजून लग्नही होत नाही तोच, कतरिना आणि विकीमध्ये जोरदार भांडण झाल्याची चर्चा आहे. सध्या या भांडणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आता या भांडणाचे कारण काय तर ‘रोका’ची लीक झालेली बातमी.

काही दिवसांपूर्वी कतरिना व विकीचा सीक्रेट रोका झाल्याच्या बातम्या लीक झाल्या होत्या. दिवाळीच्या मुहूर्तावर दिग्दर्शक कबीर खान याच्या घरी विकी व कतरिनाचा रोका झाल्याच्या बातम्या मीडियाने दिल्या होत्या. रोका सेरेमनी सीक्रेट होती. मग ही बातमी लीक झालीच कशी? यावरून म्हणे विकी व कतरिना यांच्यात वाद झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, रोकाची बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत कशी पोहोचली, यावरून विकी व कतरिना भांडले. यासाठी दोघांपैकी कोणाची टीम जबाबदार आहे, यावरून दोघांमध्ये वाद झाला. विशेषत: विकी रोका सेरेमनीची बातमी लीक झाल्याने चांगलाच संतापला आणि त्याने आपली भडास कॅटवर काढली.
चर्चा खरी मानाल तर विकी व कतरिना राजस्थानात शाही लग्न करणार आहेत. 7 ते 12 डिसेंबरदरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार असल्याचे कळतेय. अगदी सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांचे नावही गेस्ट लिस्टमध्ये आहे.

हॉटेल सिक्स सेंस बरवाडा फोर्टमध्ये कतरिना-विकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यासोबतच चौथ माता ट्रस्ट आणि हॉटेल शिवप्रिया पॅलेसमध्ये एकूण 42आलिशान खोल्यांचंही पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आलं आहे. आता सवाई माधोपूर रणथंबोर रोड स्थित फाइव्हा स्टार ताज आणि आॅबेरॉय हॉटेलमध्येही पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, विविध हॉटेल्समध्ये एकूण 125 व्हीआयपी पाहुण्यांसाठीचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुणे आणि सेलिब्रिटींनी विमानतळाहून हॉटेलपर्यंत आणण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्यासाठी 40 महागड्या अलिशान कार बुक करण्यात आल्या आहेत. यात आॅडी, रेंज रोव्हरसह वॅनिटी व्हॅन्सचाही समावेश आहे. 

Web Title: vicky kaushal got angry with katrina kaif after roka news leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.