Video: मिटक्या मारत विकी कौशलने घेतला पाणीपुरीचा आस्वाद! अभिनेता म्हणतो,"मला रडू येतंय की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 15:49 IST2024-04-14T15:48:22+5:302024-04-14T15:49:29+5:30

विकी कौशलचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.

Vicky Kaushal emotional after eat panipuri on set chava movie | Video: मिटक्या मारत विकी कौशलने घेतला पाणीपुरीचा आस्वाद! अभिनेता म्हणतो,"मला रडू येतंय की..."

Video: मिटक्या मारत विकी कौशलने घेतला पाणीपुरीचा आस्वाद! अभिनेता म्हणतो,"मला रडू येतंय की..."

विकी कौशल हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. 'मसान' सिनेमातून विकीने त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. आज विकी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता ओळखला जातो.  विकी किती मनमौजी, मस्तमौला माणूस आहे याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. विकीच्या याच स्वभावाचा अनुभव नुकताच आला. जेव्हा 'छावा' सिनेमाच्या शुटींगच्या सेटवर विकीने बिनधास्त पाणीपुरीचा आस्वाद घेतला.

विकीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हि़डीओ शेअर केलाय. यात 'छावा' च्या शुटींगमधून ब्रेक घेत विकी जेव्हा खाण्याच्या ब्रेकसाठी बाहेर आला तेव्हा त्याला समोर पाणीपुरी दिसली. पाणीपुरी पाहताच विकी भावूक झाला. विकी सध्या 'छावा'साठी खुप मेहनत घेतोय. पण पाणीपुरीसाठी विकीने एक दिवस डाएटला रामराम केला असून मनसोक्त पाणीपुरीवर ताव मारला.

विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विकीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलंय की, "खुप महिन्यानंतर चीट मील. पाणीपुरी खातोय. मला रडूच येईल आज." असं कॅप्शन देत विकीने हा व्हिडीओ शेअर केलाय. विकी सध्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात विकी संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. सिनेमात विकीसोबत रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे.

Web Title: Vicky Kaushal emotional after eat panipuri on set chava movie