'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:57 IST2024-11-06T13:57:09+5:302024-11-06T13:57:23+5:30

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु पुष्पा २ मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय (pushpa 2, chhava)

Vicky Kaushal Chhava movie release date postponed to avoid clash with Pushpa 2 allu arjun | 'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार?

'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार?

नुकतंच दिवाळीच्या मुहुर्तावर रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालेले हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांची पसंती मिळवण्यास यशस्वी होत आहेत. तरीही एकाच दिवशी दोन सिनेमे रिलीज झाल्याने कोणत्यातरी एका सिनेमाच्या कलेक्शनवर परिणाम घडतोच. डिसेंबर महिन्यातही अशीच एक टक्कर बघायला मिळणार आहे ती म्हणजे 'पुष्पा २' आणि 'छावा'. परंतु नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छावाची रिलीज डेट पुढे जाणार?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' सिनेमा ५ डिसेेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा म्हणून 'पुष्पा २'ला ओळखलं जातं. 'पुष्पा २'ची गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलीच हवा आहे. त्यामुळे 'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'छावा' ६ डिसेंबरला रिलीज होणार होता. त्यामुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलल्यास हा सिनेमा नवीन वर्षात अर्थात २०२५ ला रिलीज होईल, असं सांगण्यात येतंय. 

'छावा' सिनेमाविषयी

काहीच दिवसांपूर्वी 'छावा' सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 'मिमि' या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी 'छावा'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'छावा' सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. आता 'छावा' नक्की कधी रिलीज होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: Vicky Kaushal Chhava movie release date postponed to avoid clash with Pushpa 2 allu arjun