सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 04:04 PM2021-12-29T16:04:26+5:302021-12-29T16:05:01+5:30

Vicky kaushal: 'उरी'फेम अभिनेता विकी कौशल ’83’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होता. मात्र, सिलेक्शन झाल्यानंतर विकीने हा चित्रपट धुडकावून लावला.

vicky kaushal audition for film 83 but left after selection by kabir khan | सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

सिलेक्शन होऊनही विकी कौशलने धुडकावला '83'; लग्नामुळे नव्हे तर 'या' कारणामुळे दिला नकार

googlenewsNext

१९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वचषकाच्या विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता रणवीर सिंग  (ranveer singh) या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला असून सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामध्येच आता या चित्रपटाविषयी एक माहिती समोर आली आहे. 'उरी'फेम अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होता. या चित्रपटासाठी त्याची निवडदेखील झाली होती. मात्र, सिलेक्शन झाल्यानंतर विकीने हा चित्रपट धुडकावून लावला.

सध्या सोशल मीडियावर विकी आणि '83'  या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. विकीने हा चित्रपट नेमका का नाकारला हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर विकीने लग्नासाठी हा चित्रपट नाकारल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, विकीने चित्रपटाची ऑफर नाकारण्यामागे एक वेगळंच कारण असल्याचं समोर आलं आहे.

विक्की कौशल या कारणासाठी नाकारला  ‘83’ 

क्रिकेटविश्वातील सर्वात महत्त्वाच्या घटनेवर आधारित ‘83’  या चित्रपटासाठी विकी कौशलने ऑडिशन दिलं होतं. या चित्रपटात त्याला क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारायला मिळणार होती. विशेष म्हणजे ऑडिशन दिल्यानंतर विकी त्यात पासही झाला होता. त्यामुळे दिग्दर्शक कबीर खान यांनी मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेसाठी विकीला फायनल केलं होतं. 

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजी या चित्रपटापूर्वीच विकीने ‘83’ साठी ऑडिशन दिलं होतं.मात्र, त्यानंतर त्याने चित्रपट रिजेक्ट केला. आलिया भट्ट, विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला राजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.  विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशानंतर विकीला ‘83’  मध्ये सेकंड लीडची भूमिका करायची नव्हती. त्यामुळे त्याने सिलेक्शन झाल्यानंतर ही भूमिका नाकारली. विकीने या भूमिकेसाठी नकार दिल्यानंतर कबीर खान यांनी साकिब सलीम याची निवड केली.

दरम्यान, विकीने (Vicky Kaushal) काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) लग्नगाठ बांधली. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत आहे. तसंच विकीचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur), ‘गोविंदा मेरा नाम’ (Govinda Mera Naam), ‘द ग्रेड इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) आणि ‘तख्त’ (Takht) या चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे. 
 

Web Title: vicky kaushal audition for film 83 but left after selection by kabir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.