विकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:14 IST2019-01-21T20:14:13+5:302019-01-21T20:14:45+5:30
अभिनेता विकी कौशलचा उरी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

विकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर
अभिनेता विकी कौशलचा उरी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली असून शंभर कोटींच्या क्लबमध्ये हा सिनेमा एन्ट्री करेल, अशी शक्यता वर्तवली जाते. बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. आता विकीने आणखी एक चित्रपट साईन केला असल्याचे समजते आहे आणि यात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट हॉरर असून या चित्रपटात विकी कौशल व भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. तसेच हे दोघे पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात काम करणार आहेत.
या चित्रपटाची कथा अनेक दिवसांपासून किनाऱ्यावर उभा असणाऱ्या एका जहाजेवर आधारित असणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान चित्रपटाचे शीर्षक आणि इतर माहिती अद्यापही गुलदस्त्याच आहे.
मात्र, चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली असून बराच भाग चित्रीत झाला असल्याचेही समोर येत आहे. याची निर्मिती करण जोहर करत आहे. तर भानुप्रताप सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.