ज्येष्ठ गझलकार पंकज उधास काळाच्या पडद्याआड, साश्रूनयनांनी दिला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 18:42 IST2024-02-27T18:38:33+5:302024-02-27T18:42:36+5:30
आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

ज्येष्ठ गझलकार पंकज उधास काळाच्या पडद्याआड, साश्रूनयनांनी दिला निरोप
ज्येष्ठ गझलकार पंकज उधास यांनी काल वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पंकज उधास यांचं संपूर्ण कुटुंब आणि मनोरंजनविश्वातील अनेक गायक, संगीतकार उपस्थित होते. दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनीही पंकज उधास यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. साश्रूनयनांनी सर्वांनी पंकज उधास यांना निरोप दिला. यावेळी त्यांच्या मुलींना रडू कोसळलं. पंकज उधास यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
पंकज उधास यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या 'चिठ्ठी आयी है', 'ना कजरे की धार' या गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. दर्दी रसिकांच्या मनावर पंकज उधास यांनी नेहमीच अधिराज्य गाजवले.