"जास्त बोलू नको...",'बॉर्डर २' पाहून वरुण धवनची पत्नी म्हणालेली असं काही...; अभिनेत्याने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:21 IST2026-02-13T09:20:23+5:302026-02-13T09:21:34+5:30

'बॉर्डर २' पाहून वरुण धवनला पत्नीने दिलेला 'असा' सल्ला, अभिनेता 'ती' आठवण सांगत म्हणाला...

varun dhawan wife gave honest sweet reaction after watching border 2 the actor told the story | "जास्त बोलू नको...",'बॉर्डर २' पाहून वरुण धवनची पत्नी म्हणालेली असं काही...; अभिनेत्याने सांगितला किस्सा

"जास्त बोलू नको...",'बॉर्डर २' पाहून वरुण धवनची पत्नी म्हणालेली असं काही...; अभिनेत्याने सांगितला किस्सा

Varun Dawan On Border 2: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर २ मुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली.दरम्यान, या चित्रपटात अभिनेता वरुण धवनने महत्वाची भूमिका साकारली आहे. शिवाय चित्रपटात त्याच्यासह सनी देओल,अहान शेट्टी, दिलीजीत दोसांझ असे तगडे कलाकार आहेत.सध्या वरुण या चित्रपटाचं यश अनुभवतो आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, वरुणला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याच्याबद्दल असंख्य मीम्स बनवण्यात आले. मात्र, या सगळ्यात त्याच्या कुटुंबियांनी तसेच पत्नीने कसा पाठिंबा दिला याबद्दल त्याने सांगितलं आहे.

जे.पी.दत्ता यांच्या 'बॉर्डर' प्रमाणेच 'बॉर्डर २' ला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतो आहे.  दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्याच्याबद्दल असंख्य मीम्स बनवण्यात आले.वरुणच्या कामाचं समीक्षकांसह, चाहते कौतुक करत आहेत.अशातच बॉर्डर २ पाहून वरुणच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती,याविषयी सांगितलंय.एका कार्यक्रमादरम्यान वरुण धवन म्हणाला,"ती नेहमी म्हणते,मला माहित होतं की तू हे करू शकतोस. तुला फक्त स्वतःला आव्हान द्यायचं आहे." 

मग वरुण म्हणाला," सध्या ती म्हणते, तू जास्त पोस्ट करू नका, जास्त दिसू नको आणि जास्त बोलू नकोस. घरीही ती मला जास्त बोलू नकोस असे सांगते आणि बाहेरही ती मला जास्त बोलू नकोस असंच बोलते.पण, सनी सर आणि त्यांची पत्नीही हीच गोष्ट सांगत असतात."

सलमान खानने केला सपोर्ट

बॉर्डर २ चा ट्रेलर आल्यानंतर वरुण हावभावावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता अभिनेत्याने आपल्या  कामातून ट्रोलर्सची बोलती बंद केली. या परिस्थितीत अभिनेता सलमान त्याला कसा पाठिंबा दिला याबद्दल वरुण धवन म्हणाला,"हे सर्व चालू असतानाच रात्री मला सलमान भाईंचा फोन आला. ते फक्त हसत होते आणि म्हणाले, चांगल्या गोष्टी होणार आहेत.त्यांचा सल्ला आणि विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता." असं अभिनेत्याने सांगितलं. 

Web Title : 'बॉर्डर 2' देखने के बाद वरुण धवन की पत्नी की प्रतिक्रिया: एक झलक

Web Summary : वरुण धवन ने 'बॉर्डर 2' की सफलता और ट्रोलिंग के बीच परिवार के समर्थन पर चर्चा की। उनकी पत्नी ने उन्हें जमीन से जुड़े रहने और अधिक प्रदर्शन से बचने की सलाह दी। सलमान खान के उत्साहवर्धक शब्दों ने भी चुनौतीपूर्ण समय के दौरान उनके आत्मविश्वास को बढ़ाया।

Web Title : Varun Dhawan's Wife's Reaction After Watching 'Border 2': A Glimpse

Web Summary : Varun Dhawan discusses 'Border 2' success and family support amid trolling. His wife advises him to stay grounded and avoid overexposure. Salman Khan's encouraging words also boosted his confidence during the challenging time.