Varun Dhawan : "...नाहीतर माझी बायको मला घराबाहेर काढेल"; लेकीच्या जन्मानंतर वरुणला नताशाची वाटते भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:27 IST2024-10-17T14:15:16+5:302024-10-17T14:27:57+5:30
Varun Dhawan : वरुणने बाबा झाल्यानंतरचा त्याचा अनुभव सांगितला आहे.

Varun Dhawan : "...नाहीतर माझी बायको मला घराबाहेर काढेल"; लेकीच्या जन्मानंतर वरुणला नताशाची वाटते भीती?
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याची अपकमिंग वेब सीरीज 'सिटाडेल: हनी बनी' यामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याच्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. वरुण धवन 'सिटाडेल: हनी बनी' मधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी काही महिन्यांपूर्वीच अभिनेता एका गोड मुलीचा बाबा झाला आहे. याच दरम्यान वरुणने आता बाबा झाल्यानंतरचा त्याचा अनुभव सांगितला आहे.
वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने ३ जून २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता लेक ४ महिनांची झाली आहे. ई-टाइम्सशी बोलताना वरुण धवनने त्याच्या आयुष्यात कसा बदल झाला आहे, त्याबद्दल सांगितलं. "मी अजूनही हे शोधत आहे की, मी नेमकं किती जबाबदार असायला हवं किंवा मी अजूनही किती लहान होऊ शकतो."
"मला वाटतं की पुरुषांना यातून जावं लागतंच. सध्या नताशाच सर्वकाही करत आहे, त्यामुळेच हे सर्व श्रेय मी तिला देत आहे. सुरुवातीला स्त्री सर्वकाही करते, नंतर पुरुष येतो आणि त्याचीही यामध्ये मदत होते. मी फक्त मुलीबरोबर मस्त खेळण्याचा आनंद घेत आहे."
"बाबा होणं हे आता खूप मजेदार आहे आणि मी दररोज एक चांगला बाबा बनण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत नाही की, मी अजून तसा झालेलो आहे. आता मी खूप कमी आवाजात टीव्ही पाहतो, नाहीतर माझी बायको मला घराबाहेर काढेल" असंही वरुण धवनने म्हटलं आहे.
वरुण धवन 'स्त्री' चित्रपटात कॅमिओमध्ये दिसला होता. आता तो 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये सामंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. ही वेब सीरिज ७ नोव्हेंबर २०२४ रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. यानंतर वरुण एटलीच्या 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे, कीर्ती शेट्टी आणि वामिका गब्बी देखील या चित्रपटात दिसणार आहेत.