ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:40 IST2024-12-26T09:38:33+5:302024-12-26T09:40:35+5:30

'बेबी जॉन' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (baby john, salman khan, varun dhawan)

varun dhawan movie baby john box office report day 1 salman khan jackie shroff | ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे

ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा की नुकसान? वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ने पहिल्या दिवशी कमावले इतके पैसे

वरुण धवनचा 'बेबी जॉन' सिनेमा काल ख्रिसमसच्या मुहुर्तावर सगळीकडे रिलीज झाला. या सिनेमात वरुण धवनने प्रमुख भूमिका साकारली आहे. टीझर, ट्रेलरपासूनच  'बेबी जॉन'ची उत्सुकता शिगेला होती. अखेर काल 'बेबी जॉन' जगभरात रिलीज झाला. अशी शक्यता होती की,  'बेबी जॉन' सिनेमा ओपनिंग डेच्या दिवशीच धमाकेदार कमाई करेल. परंतु तसं झालेलं दिसत नाहीये.  'बेबी जॉन' सिनेमाने ख्रिसमसला फारच कमी कमाई केलेली दिसून येतेय.

'बेबी जॉन'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

ख्रिसमसच्या सुट्टीचा 'बेबी जॉन' सिनेमाला फायदा होईल असं बोललं जात होतं. परंतु तसं काही झालेलं दिसत नाहीये. 'बेबी जॉन' सिनेमाने ओपनिंग डेला १२ कोटींची कमाई केलीय. ख्रिसमसच्या सुट्टीचा विचार केला तर 'बेबी जॉन'ची ही कमाई कमी म्हणता येईल. कारण 'पुष्पा २' आणि 'मुफासा' या दोन सिनेमांमुळे 'बेबी जॉन'च्या कमाईवर चांगलाच परिणाम झालाय. त्यामुळे पुढे काही दिवसांमध्ये 'बेबी जॉन'ची कमाई कशी वाढते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

'बेबी जॉन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ

 

'बेबी जॉन' सिनेमा २ तास ४५ मिनिटांचा आहे. या सिनेमात सलमान खानने विशेष भूमिका साकारली आहे. सलमानचा कॅमिओ ५ ते ७ मिनिटांचा आहे.  या ५ ते ७ मिनिटांमध्ये सलमानने सर्वांचं चांगलंच मनोरंजन केलंय. अशाप्रकारे 'बेबी जॉन' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. वरुण धवनची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासूनच हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सिनेमाची चर्चा आहे. 'बेबी जॉन'मध्ये जॅकी श्रॉफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.

Web Title: varun dhawan movie baby john box office report day 1 salman khan jackie shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.