वरूण धवन माइनस तीन डिग्री तापमानात झाला शर्टलेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:20 IST2018-10-11T15:19:21+5:302018-10-11T15:20:01+5:30
वरूण धवन आलिया भटसोबत एक सीन चित्रीत केले ज्यात शून्य तीन डिग्री तापमान असतानादेखील शर्टलेस असण्याची गरज होती.

वरूण धवन माइनस तीन डिग्री तापमानात झाला शर्टलेस
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरूण धवन सध्या कारगिलमध्ये आगामी चित्रपट 'कलंक'चे चित्रीकरण करतो आहे. या सेटवर वरूण धवनसोबत आलिया भट, कुणाल खेमू व दिग्दर्शक अभिषेक वर्मन उपस्थित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरूणने माइनस तीन डिग्री तापमानात शर्टलेस सीन चित्रीत केला आहे.
नुकतेच वरूण धवनने कारगिल येथील एक फोटो शेअर केला होता. त्यात तो शर्टलेस दिसतो आहे. तसेच वरूण धवनने सोशल मीडियावर फोटो शेअर करून लिहिले की, तिथे तापमान माइनस तीन डिग्री आहे.
-3degrees ⛄️ #KALANKpic.twitter.com/GVolYVhVIT
— Varun MAUJI Dhawan (@Varun_dvn) October 11, 2018
सूत्रांच्या माहितीनुसार, वरूणने आलियासोबत एक सीन शूट केला. त्या सीनमध्ये तिथले तापमान शून्य तीन डिग्री असतानाही शर्टलेस राहायचे होते. काळजी घेण्याच्या उद्देशाने तिथे एक डॉक्टर उपस्थित होते. मात्र कोणत्याही अडथळ्याविना वरूणने चित्रीकरण केले आहे.
काही दिवसांपूर्वी वरूण, आलिया व कुणाल कारगिलासाठी रवाना झाले होते. वरूण व कुणालने देखील एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते आर्मीच्या जवानांसोबत बोलताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्य़ा माहितीनुसार, कारगिल शेड्युलमध्ये काही महत्त्वाचे सीन्स आणि एका गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हे गाणे आलिया व वरूण यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.
'कलंक'मध्ये माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर व संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.