'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:42 IST2024-11-01T15:42:09+5:302024-11-01T15:42:48+5:30

वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाचा टीझर पाहण्यासाठी बातमीवर क्लिक करा (baby john)

Varun Dhawan Baby John movie teaser leak on social media ahead singham again bhool bhoolaiyya 3 | 'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत

'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत

सध्या बॉलिवूडमध्ये नवनवीन सिनेमांची चांगलीच चलती आहे. आजच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' हे दोन सिनेमे रिलीज झाले आहेत. अशातच प्रेक्षकांना या दोन सिनेमांसोबत वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाचा ढाँसू टीझर बघायला मिळतोय. वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन'चा टीझर सोशल मीडियावर लीक झालाय. या टीझरमध्ये वरुण धवनची शानदार अ‍ॅक्शन बघायला मिळतेय. 

बेबी जॉनच्या टीझरमध्ये काय?

'बेबी जॉन'च्या टीझरमध्ये बघायला मिळतंय की, वरुण धवन एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसतोय. या टीझरमध्ये दिसतं की वरुण धवनच्या कुटुंबावर एक मोठं संकट कोसळलं असतं. या संकटात वरुण धवनच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्ती त्याच्यापासून दूर जातात. हे संकट आणणारा खलनायक दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत जॅकी श्रॉफ. अशाप्रकारे टीझरमधून कथेचा इतका अंदाज येत नसला तरीही वरुण धवन आणि जॅकी श्रॉफ यांच्यातील अ‍ॅक्शन जुगलबंदी पाहायला मिळणार यात शंका नाही.

 

कधी रिलीज होणार बेबी जॉन?

'बेबी जॉन' सिनेमात वरुण धवन, किर्थी, वामिकासोबतच सिनेमात जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. थमन हा लोकप्रिय संगीतकार सिनेमाच्या संगीताची धूरा सांभाळणार आहे. मुराद खेतानी, ज्योती देशपांडे आणि प्रिया अॅटली या तिघांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. याशिवाय ए. कलीस्वरन हे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत आहेत. २५ डिसेंबर २०२४ ला ख्रिसमसच्या मुहुर्तावर हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होतोय.

Web Title: Varun Dhawan Baby John movie teaser leak on social media ahead singham again bhool bhoolaiyya 3