वरुण-आलियाची जोडी पुन्हा भेटीला येणार, दुल्हनियाच्या तिसऱ्या भागाची स्क्रीप्ट झाली फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:11 IST2023-12-30T11:11:19+5:302023-12-30T11:11:55+5:30

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या दोन चित्रपटाच्या यशानंतर वरुण आणि आलिया पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार आहेत. 

varun dhawan and alia bhatt s superhit franchise dunhaniya part 3 will come soon script final | वरुण-आलियाची जोडी पुन्हा भेटीला येणार, दुल्हनियाच्या तिसऱ्या भागाची स्क्रीप्ट झाली फायनल

वरुण-आलियाची जोडी पुन्हा भेटीला येणार, दुल्हनियाच्या तिसऱ्या भागाची स्क्रीप्ट झाली फायनल

बॉलिवूडमध्ये अनेक असे सुपरहिट चित्रपट आहेत ज्यांचे सिक्वलही गाजले. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'दृश्यम', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हे त्यापैकीच काही सिनेमे आहेत. आता नवीन अपडेटनुसार, वरुण धवन (Varun Dhawan) आणि आलिया भटच्या (Alia Bhatt) दुल्हनिया फ्रँचायझीचा तिसरा सिनेमाही येणार हे निश्चित झाले आहे. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या दोन चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांची लाडकी जोडी वरुण आणि आलिया पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार आहेत. 

निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांनी दुल्हनिया 3 च्या कथेवर चर्चा केली. चर्चेच्या शेवटी एक स्क्रीप्ट फायनल झाली आहे. हा सिनेमा पुढील वर्षाच्या शेवटी फ्लोर वर येईल. वरुण आणि आलियाला या फ्रँचायझीने खूप लोकप्रियता दिली. सोशल मीडियावर 'वारिया फॅन क्लब' तयार झाला. दोघांची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडली. तर करण जोहरही दुल्हनिया 3 साठी खूपच उत्साहित आहे. काही महिन्यांपूर्वीच करणने तिसऱ्या भागाचे संकेत दिले होते. मात्र तेव्हा सिनेमाची कहाणी फायनल झाली नव्हती. 

करणने आपल्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांना उत्तर देताना सांगितले की,'दुल्हनिया एक सुपरहिट फ्रँचायझी आहे ज्याला खूप प्रेम मिळालं. रोमान्स आणि कॉमेडीचं मिश्रण असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करेल. मला आशा आहे की दुल्हनिया फ्रँचायझी आणखी एक इंटरेस्टिंग कहाणी घेऊन तुमच्यासमोर येईल.'

वरुण धवन सध्या वडील डेव्हिड धवन यांच्या एका सिनेमात काम करत आहे. रमेश तौरानी सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा डेव्हिड धवन यांच्या कॉमेडी युनिव्हर्सवर आधारित आहे ज्यामध्ये दोन अभिनेत्री असतील. तर दुसरीकडे आलिया भट स्वत:च्याच प्रोडक्शनखाली बनत असलेल्या आगामी 'जिगरा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: varun dhawan and alia bhatt s superhit franchise dunhaniya part 3 will come soon script final