"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:44 IST2026-03-26T13:34:30+5:302026-03-26T13:44:33+5:30
माझ्यासोबत काय दुश्मनी होती, माझे सीन्स का कापले? असा आरोप करत एका अभिनेत्याने धुरंधर २ चा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं?

"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप
'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सिनेमाची खूप चर्चा आहे. रणवीर सिंगची भूमिका असलेला हा सिनेमा अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं होतं. 'धुरंधर २' मध्ये छोटी भूमिका केलेल्या कलाकारालाही सध्या चांगली लोकप्रियता मिळतेय. परंतु एका अभिनेत्याने ''माझे सर्व सीन कापले'', असा आरोप करत दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं?
अभिनेता सैफीने 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सैफीने व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, ''तुम्ही सर्वांनी माझा धुरंधर २ हा सिनेमा बघितला असेल. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही, त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धर यांची माझ्याशी काय दुश्मनी आहे मला माहित नाही. या सिनेमात माझे एकूण ६ सीन्स होते परंतु हे सर्व सीन्स कट करण्यात आले आहेत.''
मी दिग्दर्शकाला इतकंच सांगू इच्छितो, मी चंद्रिकासोबत व्हिडीओ बनवतो ही गोष्ट तुम्हाला चुकीची वाटत असेल तर त्यासाठी माझे सीन डिलीट करुन काय साध्य होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, एका गाण्यात बॅकग्राऊंडला माझा आवाज ऐकू येतो. बाजीगर ओ बाजीगर गाण्याच्या वेळी माझा आवाज ऐकू येतो. जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा सर्व गोष्टी सुरळित होत्या.
Another drama by vadapav girl new husband🤮
— Sumit (@beingsumit01) March 24, 2026
He say Aditya dhar cut his Scence from dhurandhar 2😭 https://t.co/J7Uk31Il4Kpic.twitter.com/w0SYxJaFVe
रणवीर-संजय दत्तसोबत होते सीन्स
सैफीने पुढे सांगितलं त्यानुसार, त्याचा रणवीर सिंगसोबत एक सीन होता आणि त्यांनी संजय दत्तसोबतही शूटिंग केले होते. हे सर्व कधी आणि कसं झालं माहीत नाही, कारण ईदमुळे सध्या तो चित्रपट पाहू शकत नाहीये. पण जेव्हा त्याने चित्रपट पाहिला तेव्हा त्याला ही गोष्ट समजली. सैफीने पुढे म्हटले की, माझा सीन भाग १ मध्येच होता, पण चित्रपट मोठा असल्यामुळे मला भाग २ मध्ये कास्ट करण्यात आले.
सैफीने म्हटले की, दिग्दर्शकालाच एक गोष्ट सांगू इच्छितो की ठीक आहे, तुम्हाला जर माझे काही सीन कापायचे होते, माझ्याशी काही वैयक्तिक दुष्मनी होती, किंवा चंद्रिकासोबत मला बघून जर तुम्हाला असे वाटू लागले की हा चंद्रिकासोबत प्रसिद्ध होत आहे, आणि मी याचे सीन कापून टाकीन, तर काळजी करू नका, मी आणि चंद्रिका खूप मोठ्या स्तरावर काम करू."
अशाप्रकारे सैफीने त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली. सैफी सध्या 'वडापाव गर्ल' चंद्रिकामुळे चर्चेत आला आहे. चंद्रिका आणि सैफीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे.