आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 12:25 IST2020-08-08T12:12:46+5:302020-08-08T12:25:25+5:30

आयुष्मान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला कठोर ट्रेनिंग करावं लागणार आहे.

Vaani Kapoor and Ayushmann Khurrana first time working together in Abhishek Kapoor next movie | आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!

आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!

सध्याच्या घडीला जर बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता कोण असं कुणाला विचारलं तर कुणीही आयुष्मान खुराणा हे नाव सांगेल. कारण येऊन गेलेल्या सर्वच सिनेमांचे विषय वेगळे होते आणि हे सगळेच सिनेमे प्रेक्षाकांच्या पसंतीस पडले आहेत. आता आयुष्मान खुराणा हा बॉलिवूडच्या एका यशस्वी डायरेक्टरसोबत सिनेमा घेऊन येत आहे. अभिषेक कपूर असं या दिग्दर्शकाचं नाव असून त्याने 'रॉक ऑन', 'काय पो छे' आणि 'केदारनाथ'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात आयुष्मान पहिल्यांदाच अभिनेत्री वाणी कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

आयुष्मान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला कठोर ट्रेनिंग करावं लागणार आहे. असे मानले जात आहे की, या सिनेमाचं शूटींग ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. अभिषेक कपूर सिनेमात वाणी कपूरला कास्ट केल्याचं सांगत म्हणाला की, 'वाणी एक कमिटेड अभिनेत्री आहे. तसेच मी आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूरसोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी उत्साहीत आहे. ही जोडी सुद्धा पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे'.

वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलं होतं. हा तिचा डेब्यू सिनेमा होता. ती सुद्धा  अभिषेक कपूर आणि आयुष्मानसोबत काम करण्याबाबत उत्साहीत आहे.  ती म्हणाली की, 'मला नेहमीच अभिषेकसोबत काम करायचं होतं. कारण त्याचे सिनेमे मला नेहमीच प्रेरित करतात. त्यांच्या या सिनेमात काम करणं माझ्यासाठी मोठी संधी आहे. तसेच आयुष्मान हा आमच्या जनरेशनमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेता आहे आणि पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे'.

हे पण वाचा :

सोनाक्षी सिन्हाला लागले होते 'या' गोष्टीचे व्यसन, तिने स्वत:च केला होता हा खुलासा

"दिग्दर्शकाने माझ्या शरीराचा एक एक अंग पाहण्याची मागणी केली होती", या अभिनेत्रीने केला होता गौप्यस्फोट

Web Title: Vaani Kapoor and Ayushmann Khurrana first time working together in Abhishek Kapoor next movie