Sonakshi Sinha reveal about her mobile addiction in arbaaz khan talk show | सोनाक्षी सिन्हाला लागले होते 'या' गोष्टीचे व्यसन, तिने स्वत:च केला होता हा खुलासा

सोनाक्षी सिन्हाला लागले होते 'या' गोष्टीचे व्यसन, तिने स्वत:च केला होता हा खुलासा

अभिनेत्री सोनाश्री सिन्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सोनाक्षीने  अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने पर्सनल लाईफबाबत काही खुलासे केले. सोशल मीडियावर अनेक वेळा सोनाक्षीला लग्न करुन सेटल होण्याचा सल्ला देण्यात येतो.

सोनाक्षीने शोमध्ये तिच्या आजाराबाबत देखील खुलासा केला. असे गडबडून जाऊ नका, सोनाक्षीला  मोबाईल  फोनच्या आहारी जाण्याचा आजार झाला आहे. ऐवढेच नाही तर  बाथरुममध्ये देखील सोनाक्षी सिन्हा मोबाईल बरोबर घेऊन जाते. सोनाक्षीला मोबाईलचे व्यसन लागले आहे. 

सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१९मध्ये सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ वर्षाच्या शेवटला रिलीज झाला.  2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग ३ असे चार सिनेमा रिलीज झाले. शत्रुघ्न सिन्हा यासारख्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी आणि दुसरीकडे सलमान खानसोबत संधी यामुळे सोनाक्षीवर स्वत:ला सिद्ध करण्याचा मोठा दबाव होता. पण सोनाक्षीने या दबावाला बळी न पडता, स्वत:ला सिद्ध केले. वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वत:वर काम करत राहिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonakshi Sinha reveal about her mobile addiction in arbaaz khan talk show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.