Video : ‘मला हात लावू नकोस...’, तैमूर नॅनीवर ओरडला, बेबो झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 18:05 IST2022-02-27T18:04:41+5:302022-02-27T18:05:19+5:30
तैमूर अगदी जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आला. आजही त्याचा व्हिडीओ वा फोटो पडला रे पडला की, सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल होतो. तूर्तास त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Video : ‘मला हात लावू नकोस...’, तैमूर नॅनीवर ओरडला, बेबो झाली ट्रोल
सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मुलगा तैमूर अली खानचे (Taimur Ali Khan) स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा करतेय कोण? बेबो अर्थात करिना कपूर व सैफ अली खान जितके लोकप्रिय आहेत, तितकाच त्यांचा लाडका लेक तैमूरही लोकप्रिय आहे. तैमूर अगदी जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये आला. आजही त्याचा व्हिडीओ वा फोटो पडला रे पडला की, सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल होतो. तूर्तास त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण यावेळी त्याच्यामुळे बेबो ट्रोल होतेय. अनेकांनी सैफ अली खानला देखील ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
आता या व्हिडीओची काय भानगड आहे, ते जाणून घेऊ. तर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने तैमूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत करिना, तैमूर व तैमूरची नॅनी दिसतेय. डोळ्यांवर चष्मा आणि खांद्यावर बॅग घेऊन करिना पुढे चालताना दिसतेय आणि मागून तैमूर त्याच्या नॅनीसोबत येताना दिसतोय. नॅनी तैमूरच्या सोबत चालण्याचा, त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करते. पण तैमूर यामुळे संतापतो. नॅनीकडे बोट दाखवत,‘मला हात लावू नकोस’, असं तो रागारागात म्हणतो आणि पुढे चालायला लागतो. नंतर आई करिनासोबत कारमध्ये बसतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर युजर्सनी करिना व सैफला ट्रोल करणं सुरू केलं. अनेकांना इतक्या लहान वयात तैमूरचं हे असं वागणं आवडलं नाही. घरी वडीलही असाच बोलतो का? असा सवाल एका युजरने केला आहे.