उर्वशी रौतेला हॉस्पिटलमध्ये दाखल, शूटींग करताना झाली मोठी दुखापत! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 09:53 IST2024-07-10T09:52:27+5:302024-07-10T09:53:54+5:30

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. नेमकं काय घडलं बघा (urvashi rautela)

Urvashi Rautela was injured her hand is fracture while shooting nandamuri balkrishna film | उर्वशी रौतेला हॉस्पिटलमध्ये दाखल, शूटींग करताना झाली मोठी दुखापत! नेमकं काय घडलं?

उर्वशी रौतेला हॉस्पिटलमध्ये दाखल, शूटींग करताना झाली मोठी दुखापत! नेमकं काय घडलं?

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी. दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उर्वशी गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. शूटींग करताना गंभीर दुखापत झाल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. जबर मार बसल्याने उर्वशीला तत्काळ हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वशीच्या चाहत्यांना यामुळे काळजी लागून राहिली आहे.

उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार उर्वशी हैदराबादमध्ये नंदामुरी बालकृष्णा यांच्या आगामी तेलुगू सिनेमा 'एनबीके १०९' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान ती जखमी झाली. उर्वशीच्या टीमने तिच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. याशिवाय तिच्या हाताला मार बसला असून तो फ्रॅक्चर झाल्याचं उघड केलं.

उर्वशीवर उपचार सुरु

सध्या फ्रॅक्चर झाल्याने उर्वशीला असह्य वेदना होत आहेत. परंतु तिच्यावर डॉक्टरांकडून चांगले उपचार केले जात आहेत. उर्वशी साऊथ स्टार नंदामुरी बालकृष्णाच्या 'एनबीके १०९' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कोल्ली दिग्दर्शित या सिनेमात डुल्कर सलमान आणि प्रकाश राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस रिलीज व्हायची शक्यता आहे. दरम्यान दुखापतीतून उर्वशी लवकरात लवकर बरी व्हावी, याची तिच्या चाहत्यांना आशा आहे.

Web Title: Urvashi Rautela was injured her hand is fracture while shooting nandamuri balkrishna film