नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:06 IST2022-11-14T16:01:13+5:302022-11-14T16:06:03+5:30
उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र आता केलेल्या एक पोस्टमुळे ती चांगलीच ट्रोल झालीय.

नशेत आहेस का?...स्वत:च्या चुकीमुळे पुन्हा एकदा ट्रोल झाली Urvashi Rautela
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)फिल्मी दुनियेपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. यामुळे अभिनेत्री अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावरही येते. यापूर्वी उर्वशी क्रिकेटपटू ऋषभ पंत(Rishabh Pant)शी संबंधित वादामुळे चर्चेत होती. यादरम्यान काही चाहते अभिनेत्रीला सपोर्ट करताना दिसले, तर अनेकांनी तिची खिल्लीही उडवली. या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री ट्रोल झाली आहे.
पुन्हा ट्रोल झाली Urvashi Rautela
अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले होते. फोटोंमध्ये उर्वशी हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या मोकळ्या केसांसोबत मॅचिंग कानातले घातले होते.
फोटोपर्यंत ठीक होते, पण लोकांची नजर अभिनेत्रीच्या कॅप्शनकडे जाताच सर्वांनी तिची खिल्ली उडवली. फोटो शेअर करताना उर्वशी रौतेलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, '69 MILLION LOVE.' यासोबतचं तिनं हार्टचा एक इमोजी देखील पोस्ट केला केला. त्यामुळे आता तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. अभिनेत्रीला या फोटोंवरून जबरदस्त ट्रोल केलं जातंय. अनेक नेटकऱ्यांनी तिने 59च्या जागी 69 लिहिले आहे याचा जाणीव करुन दिली आहे.
फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आनंद तुझ्या डोक्यात गेल्यासारखा वाटतोय. 69 नाही 59M फॉलोअर्स आहेत' तर दुसर्याने लिहिले, 'अरे मॅडम 69 नाही, 59 स्वस्तातील नशा नका करुस' दुसर्या यूजरने लिहिले, 'मला माहित नाही कोणती नशा करती ही.'