ही कसली फॅशन! अभिनेत्रीने ब्लाऊजशिवाय नेसली साडी, पाठीवरील कोट्यवधींच्या हाराने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:23 IST2026-03-10T15:17:36+5:302026-03-10T15:23:01+5:30
सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या स्टाईलला बोल्ड आणि ट्रेंडी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ही कसली फॅशन! अभिनेत्रीने ब्लाऊजशिवाय नेसली साडी, पाठीवरील कोट्यवधींच्या हाराने वेधले लक्ष
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'फॅशन क्वीन' उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) नवा लूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. तिने परिधान केलेली बनारसी साडी आणि तिचं अनोखं स्टाईल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. उर्वशीने ब्लाऊज न वापरता साडीचा फ्लो आणि नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित केला आहे. ज्यामुळे हा लूक फॅशन प्रेमींमध्ये चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या स्टाईलला बोल्ड आणि ट्रेंडी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उर्वशीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने निळ्या आणि सोनेरी रंगाची अत्यंत सुंदर अशी बनारसी सिल्क साडी परिधान केल्याचं दिसतंय. या साडीवर सोनेरी धाग्यांनी फुलांचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. मात्र, या साडीपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती तिच्या 'नो ब्लाऊज' लूकची. उर्वशीने कोणत्याही ब्लाऊजशिवाय ही साडी अत्यंत स्टायलिश पद्धतीने नेसली. उर्वशी 'उलटा पल्लू' स्टाईलमध्ये आपली टोन्ड बॅक फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
पाठीवर कोट्यवधींचा हिऱ्याचा हार!
उर्वशीच्या या लूकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिने परिधान केलेले दागिने. सहसा हार गळ्याच्या पुढच्या बाजूला घातला जातो, पण उर्वशीने येथेही वेगळेपण जपले. तिने अत्यंत मौल्यवान माणिक आणि हिऱ्यांचा हार गळ्याच्या पुढच्या बाजूला न घालता चक्क पाठीवर सोडला आहे. हा हार तिच्या पाठीचे सौंदर्य अधिकच खुलवत होता. यासोबत तिने मॅचिंग कानातले घालून आपला रॉयल लूक पूर्ण केला.
आपल्या सौंदर्याला चार चाँद लावण्यासाठी उर्वशीने केसांचा हाय बन बांधला आणि त्यावर गजरा माळला. यामध्ये उर्वशी एखाद्या राजकुमारीसारखी भासत होती. मेकअपबद्दल बोलायचे झाले तर, तिने ड्यूई बेस, विंग्ड आयलाइनर आणि न्यूड लिपस्टिकची निवड केली. उर्वशीचा हा व्हिडीओ अवघ्या काही तासांतच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी तिच्या फॅशन प्रयोगावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.