काय म्हणता, उर्वशी रौतेलाने आपल्या नावावर खपवली इंटरनॅशनल मॉडेलची पोस्ट??
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:34 IST2018-09-19T21:33:56+5:302018-09-19T21:34:14+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा नकारात्मक गोष्टींसाठीचं चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती अशाच कारणासाठी चर्चेत आली आहे. होय, सध्या उर्वशी तिच्या एका पब्लिसिटी स्टंटसाठी चांगलीच ट्रोल होतेय.

काय म्हणता, उर्वशी रौतेलाने आपल्या नावावर खपवली इंटरनॅशनल मॉडेलची पोस्ट??
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा नकारात्मक गोष्टींसाठीचं चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती अशाच कारणासाठी चर्चेत आली आहे. होय, सध्या उर्वशी तिच्या एका पब्लिसिटी स्टंटसाठी चांगलीच ट्रोल होतेय. त्याचे झाले असे की, उर्वशी अलीकडे अनन्या पांडेचा कझिन अहान पांडेसोबत कॉफी डेटवर गेली होती. विशेष म्हणजे, अहानसोबत डेटवर जाताना मीडिया तिथे पोहोचेल, याची खास व्यवस्थाही तिने केली होती. मी कुण्या खास व्यक्तिसोबत डेटवर जातेय, हा संदेश तिने आपल्या पीआरच्या माध्यमातून मीडियापर्यंत पोहोचवला होता. पण कॉफी घेतल्यानंतर रेस्टारंटमधून बाहेर पडताना समोर मीडिया पाहून ती अशी काही रिअॅक्ट झाली होती की,जणू तिला काही ठाऊकचं नाही.
उर्वशीच्या या पब्लिसिटी स्टंटची बातमी मीडियात आली. साहजिकचं ती वाचून उर्वशीचा व्हायचा तो जळफळाट झाला. मग काय, मीडियाला भले-बुरे खूप काही सुनावणारी एक लांबलचक पोस्ट तिने लिहिली. उर्वशीची ही पोस्ट चांगलीच गाजली. पण खरी बातमी पुढे आहे. ही पोस्टही चोरीची निघाली.
होय, ऐकून धक्का बसेल पण ही पोस्ट उर्वशीने लिहिली नव्हती तर इंटरनॅशनल मॉडल जीजी हडिडची पोस्ट जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून आपल्या नावाने खपवली होती.
MY EYES ARE TATTOOED TO HIS CHEST. GIGI ENDED THAT ANTI 💀 pic.twitter.com/0xOIzkjwCm
— Zayn&Gigi News (@ZigiFacts) July 3, 2018
जीजीची इंटरनॅशनल मीडियाला फटकारणारी ओरिजिनल पोस्ट
काही महिन्यांपूर्वी जीजी इंटरनॅशनल मीडियाला फटकारणारी ही पोस्ट लिहिली होती. जीजीच्या पोस्टमध्ये आणि उर्वशीच्या पोस्टमध्ये केवळ एका ओळीचा बदल आहे. म्हणजे ती एक ओळ लिहिण्याची तसदी उर्वशीने घेतली होती. उर्वरित सगळा मजकूर अगदी पूर्णविराम, स्वल्पविरामासह जशाच्या तसा कॉपी केला आहे. आपण स्मार्टली कॉपी करून, असा कदाचित उर्वशीचा अंदाज होता. पण मीडियाच्या नजरेतून हेही सुटले नाही. स्पॉटबॉयने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता उर्वशी यावर कशी रिअॅक्ट होते, ते बघूच.