​ उर्वशी रौतेला करू लागली को-स्टार्सचा ‘हेट’! ‘हेट स्टोरी4’ मिळताच स्वत:ला समजू लागली ‘सुपरस्टार’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 07:46 AM2018-02-18T07:46:13+5:302018-02-18T13:16:13+5:30

कालपर्यंत उर्वशी रौतेला हे नाव कुठेही चर्चेत नव्हते. पण ‘हेट स्टोरी4’ हा चित्रपट साईन करताच उर्वशी अचानक चर्चेत आली ...

Urvashi began to cry, 'hat' of co-stars! 'Hate Story 4' got itself recognized as 'superstar'! | ​ उर्वशी रौतेला करू लागली को-स्टार्सचा ‘हेट’! ‘हेट स्टोरी4’ मिळताच स्वत:ला समजू लागली ‘सुपरस्टार’!

​ उर्वशी रौतेला करू लागली को-स्टार्सचा ‘हेट’! ‘हेट स्टोरी4’ मिळताच स्वत:ला समजू लागली ‘सुपरस्टार’!

googlenewsNext
लपर्यंत उर्वशी रौतेला हे नाव कुठेही चर्चेत नव्हते. पण ‘हेट स्टोरी4’ हा चित्रपट साईन करताच उर्वशी अचानक चर्चेत आली आणि इतकी की, आपण खूप मोठी स्टार आहोत, असे म्हणे उर्वशीला वाटू लागले आहे. याचा परिणाम म्हणजे, उर्वशी नको इतके नखरे दाखवू लागली आहे.  करण वाही व विवान भटेना या ‘हेट स्टोरी4’च्या को-स्टारपेक्षा ती स्वत:ला काहीतरी वेगळी समजू लागली आहे. होय, याचमुळे या दोघांसोबत मुलाखत द्यायला उर्वशीने म्हणे नकार दिला. ‘हेट स्टोरी4’च्या प्रमोशनदरम्यान सगळा फोकस स्वत:वर राहावा, यासाठी  तिला आटापिटा चाललाय. कुण्याही को-स्टारसोबत मुलाखत देणार नाही, असे तिने जाहिर करून टाकलेय. अलीकडे एका मीडिया हाऊसला ती मुलाखत देणार होती. मात्र करण व विवान हेही आपल्यासोबत मुलाखत देणार, असे कळताच, तिने या मुलाखतीला नकार दिला. मी टीव्ही स्टार्ससोबत मुलाखत देणार नाही, असे तिने सांगून टाकले. अखेर संबंधित मीडिया हाऊसला करण व विवानची मुलाखत रद्द करावी लागली.
‘हेट स्टोरी4’ हा उर्वशीचा चौथा चित्रपट आहेत.  अद्याप बराच मोठा पल्ला गाठणे बाकी असताना आत्ताच उर्वशीच्या डोक्यात हवा गेलेली दिसतेय. आता या परिणाम काय, इतके न कळण्याइतपत उर्वशी नक्कीच दुधखुळी नाही. 

ALSO READ : ​बोल्ड डान्स मूव्जसाठी उर्वशी रौतेलाने केले ‘हे’ काम !!

‘हेट स्टोरी4’ हा चित्रपट येत्या ९ मार्चला रिलीज होतोय. विशाल पांड्या दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता करण वाही   लीड रोलमध्ये आहे. याशिवाय एक नवा चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  पंजाबी अभिनेत्री इहाना ढिल्लन या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. सूरज पांचोली आणि गुरमीत चौधरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
‘हेट स्टोरी’ बॉक्सआॅफिसवर एक हिट फ्रेंचाइजी आहे. सस्पेन्स, थ्रील आणि बोल्डनेस असा सगळा मसाला असल्यामुळे ही फ्रेंचाइजी इतकी हिट ठरलीय.a

Web Title: Urvashi began to cry, 'hat' of co-stars! 'Hate Story 4' got itself recognized as 'superstar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.