Urvashi Rautela : अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 14:43 IST2022-12-07T14:23:12+5:302022-12-07T14:43:28+5:30

Urvashi Rautela : लग्न समारंभातील उर्वशीची काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Urvashi Rautela brother wedding actress wore lehenga costing 35 lakh and jewellery cost is 85 lakh rupees | Urvashi Rautela : अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक

फोटो - आजतक

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या उर्वशीच्या घरात लगीनघाई सुरू असून ती लाडक्या भावाच्या लग्नात धमाल करत आहे. लग्न समारंभातील उर्वशीची काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. उर्वशी भावाच्या लग्नासाठी तिच्या गावी म्हणजे उत्तराखंडला पोहोचली. 

रिपोर्टनुसार, भावाच्या लग्नासाठी उर्वशी तिच्या होमटाऊनला गेली आहे. उर्वशीने सकमुंडा गावातील तिच्या वडिलोपार्जित घरी जाण्याआधी सिद्धबली मंदिरालाही भेट दिली. लग्नात उर्वशीचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे. तिने सुंदर लेहंगा आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच भरजरी दागिने घातले आहेत. सिक्विन आणि स्टोनची बॉर्डर असलेल्या शीयर दुपट्टयासह तिने आपला एथनिक लूक कम्पलीट केला आहे. तसेच यावर स्टोन एक्सेंट आणि ग्रीन ड्रॉप बीड्सवाली हेवी ज्वेलरी घातली आहे. 

उर्वशीचा लूक सर्वांना प्रचंड आवडला आहे. मात्र त्यासाठी तिने खर्च केलेले पैसे ऐकलेत तर हैराण व्हाल. तिच्या सुंदर लेहंग्याची किंमत 35 लाख रुपये तर दागिन्यांची किंमत तब्बल 85 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच तिच्या एकूण लूकची किंमत ही जवळपास 1 कोटी 20 लाख आहे. 

उर्वशी लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता राम पोथिनेनीसोबत काम करतेय. याशिवाय ती 'इन्स्पेक्टर अविनाश' या चित्रपटात रणदीप हुड्डासोबत काम करणार आहे. उर्वशी लवकरच हॉलिवूडच्याही एका प्रोजेक्टमध्ये काम कऱणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Urvashi Rautela brother wedding actress wore lehenga costing 35 lakh and jewellery cost is 85 lakh rupees