लाखों का मामला! उर्वशी रौतेलाच्या स्टायलिश बॅगची होतीये चर्चा; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:38 IST2023-09-29T12:37:13+5:302023-09-29T12:38:27+5:30

Urvashi rautela: उर्वशीची साधीसुधी दिसणारी बॅग साधी नसून त्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत.

urvashi-rautela-amps-airport-look-in-denim-outfit-pairs-it-with-a-fendi-tote-worth-rs-5-lakh | लाखों का मामला! उर्वशी रौतेलाच्या स्टायलिश बॅगची होतीये चर्चा; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

लाखों का मामला! उर्वशी रौतेलाच्या स्टायलिश बॅगची होतीये चर्चा; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हे नाव आता कोणासाठीही नवीन राहिलेलं नाही. उर्वशी तिच्या फिल्मी करिअरपेक्षा ग्लॅमरस लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. यात खासकरुन तिच्या महागडे कपडे, ब्रँडेड बॅग्स, फूटवेअर हे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. यावेळी तिची एक बॅग चर्चेत आली आहे. या बॅगची किंमत चक्क लाखांच्या घरात असून यासाठी उर्वशीने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिने बॉर्डरवर स्लिट डिटेलिंग असलेली फ्लेअर्ड जीन्स परिधान केली होती. सोबतच हॉल्टर नेक क्रॉप टॉप, डेनिम जॅकेट घातलं होतं. या लूकला मॅच करणारी एक स्टायलिश बॅगही तिने कॅरी केली होती.  काळ्या आणि गोल्डन रंगाची असलेली उर्वशीची ही बॅग दिसायला अत्यंत साधी आहे. मात्र, त्यासाठी तिने ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम मोजली आहे.

उर्वशीची ही टोट बॅग Fendi या प्रसिद्ध ब्रँडची असून या बॅगची किंमत ६ हजार ३४२ डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ५ लाख २७ हजार ६५७ रुपये इतक्या किंमतीची आहे.

दरम्यान, उर्वशी कायम तिच्या महागड्या आणि ब्रँडेड वस्तूंमुळे चर्चेत येत असते. उर्वशीने २०१३ मध्ये 'सिंह साब द ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे, पागलपंती, हेट स्टोरी 4 या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. तसंच ती दिल है ग्रे आणि ब्लॅक रोज या सिनेमांमध्येही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: urvashi-rautela-amps-airport-look-in-denim-outfit-pairs-it-with-a-fendi-tote-worth-rs-5-lakh