दुबईतील रेस्तराँमध्ये केला उर्वशी रौतेलाने सालसा डान्स, सोशल मीडियावर शेअर केले Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:11 IST2019-01-02T16:09:38+5:302019-01-02T16:11:03+5:30
या व्हिडिओत उर्वशी रौतेला डान्सर्ससोबत सालसा करताना दिसतेय. तिचे डान्स मुव्स बघून सोशल मीडिया यूजर्स तिचे कौतुक करत आहेत.

दुबईतील रेस्तराँमध्ये केला उर्वशी रौतेलाने सालसा डान्स, सोशल मीडियावर शेअर केले Video
'हेट स्टोरी-४'मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या दुबईमध्ये हॉलेडे एन्जॉय करत आहे.या दरम्यानच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करत असून तिच्या चाहत्यांकडून खूप सारे वाहवा मिळून घेत आहे.सध्या या हॉलिडे दरम्यानचा एक व्हीडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती डान्सर्ससोबत सालसा करताना दिसतेय. तिचे डान्स मुव्स बघून सोशल मीडिया यूजर्स तिचे कौतुक करत आहेत. आपल्या पाच वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये उर्वशीने फक्त पाच चित्रपटांत काम केले आहे. यापैकी एकाही चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये यश मिळवून दिले नाही. सध्या तिच्याकडे एकाही चित्रपटाची ऑफर नाही.
उर्वशी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, ती सलमान खानची चाहती आहे काय? त्यावर तिने म्हटले की, मी सलमानची खूप मोठी चाहती आहे. केवळ चाहतीच नाही तर मला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे.
खरं तर सलमान खान चित्रपटांबरोबरच लग्नावरूनही चर्चेत असतो. सध्या सलमानचे वय ५२ वर्ष इतके आहे. परंतु अशातही तो अविवाहित जीवन जगत आहे. तो लग्न का करीत नाही? हा एक खूप मोठा प्रश्न असून, सातत्याने यावर चर्चा रंगत आली आहे. विशेष म्हणजे अजूनही सलमानसोबत लग्न करण्यासाठी तरुणी एका पायावर तयार आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील तरुणी सलमानवर फिदा आहेत. अनेकांनी तर त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखविली आहे.
उर्वशीने 2013 मध्ये 'सिंह सहाब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या उर्वशीने वयाच्या 15 व्या वर्षी इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता. 2011 मध्ये तिने इंडियन प्रिन्सेस, मिस टूरिज्म, मिस एशियन सुपरमॉडेलचा किताब आपल्या नावी केला होता.