उर्वशी रौतेला न्यू इअरला दुबईतील या हॉटेलमध्ये राहणार उपस्थित, १५ मिनिटांसाठी घेतले ४ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 13:14 IST2020-12-30T13:13:52+5:302020-12-30T13:14:29+5:30
यंदाच्या न्यू इअरला परफॉर्म करण्यासाठी उर्वशी रौतेलाने घसघशीत मानधन घेतले आहे.

उर्वशी रौतेला न्यू इअरला दुबईतील या हॉटेलमध्ये राहणार उपस्थित, १५ मिनिटांसाठी घेतले ४ कोटी
फॅशन आइकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सना सरप्राईज देत असते. आता समजते आहे की बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नवीन वर्षाच्या निमित्ताने दुबईतील हॉटेलमध्ये उपस्थिती लावणार आहे. पण तिची ही उपस्थिती आयोजकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहे.
न्यू इअरच्या उपस्थितीसाठी उर्वशी रौतेलाने घसघशीत मानधन घेतले आहे. उर्वशी रौतेलाशी निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इअरला दुबईतील प्लाजो वर्साचे हॉटेलमध्ये हजेरी लावणार आहे. असे सांगितले जात आहे की १५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे. ही खूप मोठी रक्कम आहे. अशारितीने उर्वशी नवीन वर्षात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून झळकली होती. आता उर्वशी लवकरच इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
याविषयी बोलताना अभिनेता मोहम्मद रमदान म्हणाला, "उर्वशी बॉलिवूडमधील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.. मला खात्री आहे कि तिला आपण लवकरच हॉलिवूडमध्ये बघाल. उर्वशी बरोबर काम करायला मला नक्कीच मजा येणार आहे आणि हा एक सुंदर अनुभव असणार आहे.''
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अखेरची ती व्हर्जिन भानुप्रिया नावाच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उर्वशी सध्या तिच्या आगामी तेलगू चित्रपट ब्लॅक रोझच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.