Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नोकरीच्या शोधात, रेझ्युमे पोस्ट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:24 AM2024-05-27T11:24:52+5:302024-05-27T12:14:17+5:30

उर्फी जावेदनं रेझ्युमे शेअर करत थेट नोकरीची मागणी केली आहे. 

Uorfi Javed looking for receptionist job share her resume on instagram | Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नोकरीच्या शोधात, रेझ्युमे पोस्ट करत म्हणाली...

Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नोकरीच्या शोधात, रेझ्युमे पोस्ट करत म्हणाली...

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनोख्या फॅशन सेन्ससाठी ती प्रसिद्ध आहे. नेहमीच आपल्या तोकड्या, अतरंगी कपड्यांमुळे ती लोकांचं लक्ष वेधून घेते. मात्र, यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. असं असूनही उर्फी कामय चर्चेत असते. यातच उर्फी जावेदच्या हिच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फी जावेदनं रेझ्युमे शेअर करत थेट नोकरीची मागणी केली आहे. 

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर रेझ्युमे शेअर केला आहे.  तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास तयार आहे. होय, मी नोकरीच्या शोधत आहे... कारण 31 मे खरोखर जवळ आला असून माझा फॅशन करिअर धोक्यात आलं आहे. त्यामुळे आता मला माझ्या माझ्या भुकेल्या पोटासाठी काहीतरी काम करावं लागले. तुमच्या प्रत्येक सूचनांचं स्वागत आहे. मित्रांनो... ३१ मे पूर्वी नवीन नोकरी शोधण्यासाठी मला मदत करा!! (जर तुमचं माझ्यावर खरचं प्रेम असेल तर कृपया @Myntra ला end of reason sale  बंद करण्यास सांगा). 

उर्फीनं तिच्या रेझ्युमेमध्ये अगदी मजेशीर गोष्टी लिहल्या आहेत. experience या सेक्शनमध्ये तिनं, मी उत्तमरित्या ट्रोलिंग सांभाळू शकते, असं लिहलं.  उर्फीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. काहींनी तिला नोकरीची ऑफर दिली. तर काहींनी उर्फीला नोकरीची काय गरज असं म्हटलं आहे. नेटकऱ्यांच्या मते उर्फीला नोकरीची खरचं गरज नसून तिची ही पोस्ट Myntra च्या end of reason sale ची जाहिरात करणारी आहे.  

उर्फी जावेद कोट्यवधींची मालकीण असून फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. उर्फी सध्या मुंबईत राहते आणि तिचा एका आलिशान फ्लॅट आहे. उर्फी जावेदने फॅशनिस्टा बनण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्फीने 'दुर्गा', 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यासारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. पण तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस OTT मधून मिळाली. उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. 

Web Title: Uorfi Javed looking for receptionist job share her resume on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.