सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्नाने बदललं नाव?; 'त्या' पोस्टनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:36 PM2024-03-08T13:36:39+5:302024-03-08T13:37:03+5:30

Twinkle Khanna: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ट्विंकलने ही पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी तर्कवितर्क लावत आहेत.

twinkle-khanna-intsa-post-kumar-s-plus-one-latest-news-social-media-viral-fans-shocked | सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्नाने बदललं नाव?; 'त्या' पोस्टनंतर चर्चेला उधाण

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्नाने बदललं नाव?; 'त्या' पोस्टनंतर चर्चेला उधाण

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिचा बॉलिवूडमधील वावर आता कमी झाला आहे. मात्र, बेधडक वक्तव्य आणि हटक स्टाइल यांच्यामुळे ती कायम चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या घटनांवर ट्विंकल बेधडकपणे तिचं मत मांडत असते. मात्र, यावेळी ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

ट्विंकलने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असून ट्विंकल-अक्षयच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

नेमकी काय आहे ट्विंकलची पोस्ट?

अभिनेत्री असण्यासोबतच ट्विंकल एक लेखिका आणि निर्मातीदेखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे. यामध्येच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचं नाव खोडून त्याखाली 'कुमार एस प्लस वन' असं लिहिलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही युजर्सच्या मते ट्विंकलने तिचं माहेरचं खन्ना हे आडनाव हटवून सासरचं कुमार नाव लावण्यास सुरुवात केल्याचं काहींनी म्हटलं आहे. तर काहींच्या मते, तिच्या घरी गुडन्यूज येणार असेल त्यामुळेच तिने कुमार +1 असा बदल केला आहे. मात्र, आता ट्विंकलच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे ट्विंकलच स्पष्ट करु शकते.

Web Title: twinkle-khanna-intsa-post-kumar-s-plus-one-latest-news-social-media-viral-fans-shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.