Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:28 IST2020-12-29T16:19:18+5:302020-12-29T16:28:14+5:30
ट्विंकल म्हणजे एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व. मनात येईल ते बेधडक बोलणारी. यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते

Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण
ट्विंकल खन्नाचा जन्म तिच्या वडिलांच्या वाढदिवशी झाला होता. आज (2 डिसेंबर) ट्विंकल आणि तिचे सुपरस्टार दिवंगत वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस आहे. ट्विंकलने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती, पण आता ती लेखिका आहे, ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी संबंधित काही इंटरेस्टिंग जाणून घ्या.
ऑपरेशनंतर ठिक झाले होते डोळे
ट्विंकल खन्ना स्वत: ला भाग्यवान समजते की तिचा जन्म वडिलांच्या वाढदिवशी झाला होता. ती तिच्या वडिलांच्या अगदी जवळ राहिली आहे. ट्विंकल खन्ना बॉलिवूडचा अक्षय कुमारची पत्नी आणि दोन मुलांची आई आहे. तिचा सेंस ऑफ ह्यमुर जबरदस्त आहे आणि ती सोशल मीडियावर अनेकवेळा ती मजेशीर पोस्ट शेअर करत असते. फार कमी लोकांना माहित आहे की जेव्हा तिने पदार्पण केले तेव्हा ट्विंकलने तिच्या डोळे थोडेसा तिरळेपणा होते. ऑपरेशनंतर मात्र तो ठीक झाले.
लॉकडाऊन दरम्यान ट्विंकल खन्नाने एक इंटरेस्टिंग पोस्ट शेअर केली. यात तिने म्हटले होते की, 25 वर्षांपूर्वी तिने आपल्या जीवनाविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ट्विंकलने काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
ट्विंकलने सांगितले की रेडिफ ऑफिसच्या लाइव्ह चॅट दरम्यान तिला येत्या 10 वर्षांबद्दल प्रश्न विचारले गेले होते. 10 वर्षांत ती स्वत: कुठे पाहते. ट्विंकलने सांगितले की ती तिच्या फॉर्ममध्ये 2 मुलं, 1 कुत्रा आणि कदाचित पतीसह असेल.
दोनवेळा झाला होता साखरपुडा
फार कमी लोकांना हे माहिती आहे की, ट्विंकल खन्नाचा साखरपुडा 2 वेळा झाला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस तो अक्षय कुमारसोबतच झाला होता. रिपोर्ट्सनुसार पहिल्यांदा साखरपुडा झाल्यानंतर तिचे अक्षयसोबत ब्रेकअप झाला होता. यामुळे तिला खूप वाईट वाटले. मग गोष्टी नीट झाल्यावर त्यांनी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार दोघांनी लग्नानंतर पुन्हा साखरपुडा केला होता.