अक्षय कुमारच्या लेकीला पाहिलंत?,आई ट्विंकलची हुबेहुब कार्बन कॉपी असलेल्या निताराला पाहून नेटिझन्स म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 15:50 IST2023-02-20T15:37:57+5:302023-02-20T15:50:18+5:30
सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, अक्षय कुमारची मुलं लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात.

अक्षय कुमारच्या लेकीला पाहिलंत?,आई ट्विंकलची हुबेहुब कार्बन कॉपी असलेल्या निताराला पाहून नेटिझन्स म्हणाले....
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी आपल्या दोनही मुलांना कायम लाईमलाईट पासून दूर ठेवणं पसंत केलं. अलीकडेच ट्विंकल-अक्षयसोबत मुलगी नितारासोबत स्पॉट झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं. व्हिडीओमध्ये ट्विंकल निताराचा हात पकडून चालताना दिसतोय. नितारा आता बरीच मोठी झाली आहे, आईच्या खांद्याच्यावर गेली आहे.
मुलगी आणि आई- वडिलांच्या जोडीचा हा एक खूपच क्युट व्हिडीओ व्हायरल होतोय आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या नजरा अक्षयची लेक नितारावर खिळल्या आहेत. नितारा आईसारखीच खूप सुंदर दिसते अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. उंचीमध्ये ती तिची आई ट्विंकलच्या खांद्यापेक्षा उंच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नितारा तिच्या वडिलांच्या बाजूने चालत आहे आणि कॅमेराचे फोकस टाळते आहे.
काही महिन्यांपूर्वीच अक्षय आणि ट्विंकल खाना यांची नितारा १० वर्षांची झाली. या निमित्ताने अक्षयनं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. नितारासोबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अक्षयने लिहिले की, "माझा हात धरण्यापासून ते आता तिची शॉपिंग बॅग उचलण्यापर्यंत, माझी मुलगी खूप पटकन मोठी होत आहे. आज ती 10 वर्षांची झाली आहे... डॅडी तुझ्यावर प्रेम करतो." अशा शब्दांत अक्षयनं आपलं लेकी वरचं प्रेम व्यक्त केलं होतं. नितारा ही अक्षय आणि पत्नी ट्विंकल खन्ना यांची धाकटी लेक आहे. त्यांना एक मोठा मुलगा आरव असून तो २० वर्षांचा आहे.