Video: 'माझा आनंद हरपला..'; अंकिताने दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 14:31 IST2023-08-13T14:30:03+5:302023-08-13T14:31:16+5:30

Ankita lokhande: अंकिता लोखंडेने घेतलं वडिलांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन; पार पाडलं मुलाचं कर्तव्य

tv-ankita-lokhande-father-death-shashikant-lokhande-funeral-today | Video: 'माझा आनंद हरपला..'; अंकिताने दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

Video: 'माझा आनंद हरपला..'; अंकिताने दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या वडिलांचं शनिवारी (१२ ऑगस्ट) निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनामुळे अंकिता प्रचंड कोसळली असून नुकताच तिच्या वडिलांच्या अंतिम दर्शनाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर  योगेन शहा आणि 'इन्स्टंट बॉलिवूड' यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने तिच्या वडिलांचं अखेरचं दर्शन घेतलं. इतकंच नाही तर तिने वडिलांच्या पार्थिवाला खांदादेखील दिला. वडिलांचा आधार हरपल्यानंतरही अंकिता स्वत:ला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचं सांत्वन करताना पती विकी जैन दिसत आहे. 

दरम्यान, अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झाल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शशिकांत लोखंडे यांच्या निधनामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 
 

Web Title: tv-ankita-lokhande-father-death-shashikant-lokhande-funeral-today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.