विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 11:33 IST2024-05-02T11:32:45+5:302024-05-02T11:33:42+5:30

विराटने आमिरला अकायचा फोटो दाखवला अन्...

tv actor Amir Ali reveals how does Virat Kohli and Anushka Sharma s son Akaay look | विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...

विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...

अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला. 'अकाय' (Akaay) असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. किंग कोहलीला (Virat Kohli) मुलगा झाल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर अकायच्या नावाने हजारो फॅन पेज उघडण्यात आले. विराट आणि अनुष्का या कपलच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगचा अंदाज त्यावरुन आला. काही दिवसांपूर्वीच अनुष्का दोन्ही मुलांसह(वामिका आणि अकाय) भारतात परतली. मात्र अद्याप तिने पापाराझींना सध्या फोटो पोस्ट करण्यास मनाई केली आहे. दरम्यान विरुष्काचा मुलगा अकाय कसा दिसतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकतंच टीव्ही अभिनेता आमिर अलीने (Amir Ali) याबाबत खुलासा केला आहे.

टीव्ही अभिनेता आमिर अलीने काही दिवसांपूर्वी विराट कोहलीसोबत एक कॅम्पेन शूट केलं. यावेळी त्यांच्यात ऑफ कॅमेरा छान गप्पागोष्टीही झाल्या. विराटने आमिरला अकायचा फोटो दाखवला. झूम ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, "विराटसोबत मी क्रिकेटच्या गप्पा मारल्या. पण जेव्हा तो त्याच्या कुटुंबाविषयी सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. तो मुलांचे फोटो दाखवत होता, अनुष्काबद्दल सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं. मला त्याची हीच गोष्ट खूप आवडली."

आमिर पुढे म्हणाला, "मी फोटो पाहून विराटला म्हणलं की अकाय फारच क्युट आहे. बरं झालं तुम्ही मुलांना लाईमलाईपासून दूरच ठेवता. तेव्हा तो म्हणाला हा अनुष्काचाच निर्णय होता. लहान मुलांना त्यांचं बालपण एन्जॉय करता आलं पाहिजे. आणि हो अकाय एकदम क्युट, गोलू मोलू  आहे."

अनुष्काने 15 फेब्रुवारी रोजी अकायला लंडनमध्ये जन्म दिला. डिलीव्हरीच्या आधीपासूनच विराट अनुष्का लंडनमध्येच होते. त्यांना भारतातील लाईमलाईटपासून दूर वेळ घालवायचा होता. 

Web Title: tv actor Amir Ali reveals how does Virat Kohli and Anushka Sharma s son Akaay look