तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:33 IST2024-02-27T09:28:58+5:302024-02-27T09:33:50+5:30

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Tusshar Kapoor To Play A Cameo In Ekta Kapoor's 'Love struck in cinemas 19th April | तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तुषार कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांचा आगामी चित्रपट LSD 2 घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आता निर्माते सिनेमाच्या सिक्वेलची तयारी करत आहेत. या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यातच आता अभिनेता तुषार कपूर  LSD 2 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.

 तुषार कपूर एकता कपूरच्या  LSD 2 मध्ये एक महत्त्वाचा कॅमिओ साकारताना दिसणार आहे. याआधी एकता आणि तुषार 'क्या कूल हैं हम', 'शूटआउट ॲट वडाला' आणि 'द डर्टी पिक्चर' सारख्या चित्रपटात एकत्र आले आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी LSD 2 चे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. पहिले पोस्टर 2023 मध्ये शेअर करण्यात आलं होतं आणि दुसरं पोस्टर  यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी रिलीज करण्यात आलं होतं. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तुषार कपूर चित्रपटांमध्ये साकारलेल्या विनोदी व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही डायलॉगशिवाय लोकांना हसवणाऱ्या तुषार कपूरची ग्लॅमर दुनियेत एक वेगळीच ओळख आहे. तुषार कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. तुषार कपूरचा पहिला चित्रपट करीना कपूरसोबत होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

तुषारच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तो सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला. त्याने मुलाचे नाव लक्ष्य ठेवलं आहे. तो प्रत्येक चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर घेऊन जातो.  बॉलिवूडमधील पहिलाच सिंगल फादर म्हणून त्याला खास ओळखले जाते. २०१६ मध्ये लक्ष्य हा तुषारच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

Web Title: Tusshar Kapoor To Play A Cameo In Ekta Kapoor's 'Love struck in cinemas 19th April