लाखो दिलो की धडकन! Turkey अभिनेत्री Hande Ercel मुंबईत दाखल, 'या' हिरोंसोबत करायचंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 17:39 IST2024-03-07T17:37:56+5:302024-03-07T17:39:58+5:30
प्यार लफ्जो मे कहा ही टर्किश मालिका भारतातही गाजली होती. हांडेची भारतातही जाम क्रेझ आहे.

लाखो दिलो की धडकन! Turkey अभिनेत्री Hande Ercel मुंबईत दाखल, 'या' हिरोंसोबत करायचंय काम
Hande Ercel India: टर्कीश टीव्ही अभिनेत्री हांडे एर्सेल (Hande Ercel) अनेकांना माहित आहे. भारतातही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. हांडेने तिच्या निरागस सौंदर्याने आणि लुक्सने सर्वांनाच घायाळ केलं आहे. तुर्की मध्ये ती प्रसिद्ध टीव्ही स्टार आहे. हांडे नुकतीच भारतात आली असून हा तिचा पहिलाच भारत दौरा आहे. हांडेने नुकताच FICCI फ्रेम्स इव्हेंट अटेंड केला. यावेळी तिने भारतीय सिनेमातील कोणत्या अभिनेत्यांसोबत काम करायला आवडेल याचंही उत्तर दिलं.
हांडे एर्सेल सध्या मुंबईत असून वेगवेगळ्या गोष्टी बघत आहे. भारतीय संस्कृती, ठिकाणं यांना ती भेटी देत आहे. तिला सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन करायचीही इच्छा आहे. तसंच मुंबईतल्या ट्रॅफिकबद्दलही तिला कल्पना आहे. या कार्यक्रमात हांडे आयुष्मान खुरानासोबत From Bollywood to turkish Drama: acting across borders' या सेशनमध्ये सहभागी झाली. तिला आयुष्मानची गाणी खूप आवडतात असंही ती म्हणाली. 'मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या संस्कृती बघायला आवडतात. मला भारतीय संस्कृतीचं कायम आकर्षण वाटलं आहे. मला भारतात यायचंच होतं. इथली पारंपरिक साडीही मला नेसायची आहे.'
तसंच बॉलिवूडबद्दल सांगताना हांडे म्हणते, "मला हृतिक रोशन, आमिर खान आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करायला आवडेल. भारतात येण्याची ही माझी योग्य वेळ आहे. माझ्यासाठी नवीन दारं खुली होत आहेत. हिंदी फिल्म्सबद्दल सांगायचं तर मला PK, 3 इडियट्स हे सिनेमे आवडतात. ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा आणि देव पटेल यांची मी चाहती आहे. तसंच मला संजय लीला भन्साळींसोबत काम करायची इच्छा आहे. मी बरेच हिंदी सिनेमे ऑनलाईन बघितले आहेत."
हांडे एर्सेल गेल्या १० वर्षांपासून टर्किश टीव्ही माध्यमात काम करत आहे. 'प्यार लफ्जो मे कहा' ही तिची सर्वात गाजलेली मालिका आहे. याच मालिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली. भारतातही तिच्या चाहत्यांची संख्या वाढली. या मालिकेत तिने हयात ही भूमिका साकारली होती.